Ticker

6/recent/ticker-posts

केबल वायरची चोरी, घरफोडी करणाऱ्या आरोपीतांकडून 1,75,800/-रूपयाचा मुद्देमाल जप्त:-




(स्थानिक गुन्हे शाखा,नांदेड यांची कारवाई)



{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}

नांदेड-मा.श्री.अभिनाश कुमार,पोलीस अधीक्षक नांदेड यांनी ऑपरेशन फ्लश आउट अंतर्गत माली गुन्हयातील आरोपीचा शोध घेवुन गुन्हे उघड करणे बाबत विशेष मोहीम राबवुन कार्यवाही करणे बाबत श्री.अतुल भोसले पोलीस निरीक्षक स्था.गु.शा.नांदेड यांना आदेशीत केले होते.

त्यावरून पोलीस निरीक्षक स्था.गु.शा नांदेड यांनी स्था.गु.शा.येथील पोउपनि साईनाथ पुयड व त्यांचे पथकातील अंमलदार यांना वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्यवाही करण्याचे आदेशीत केले होते.

त्यावरून दिनांक 18/06/2026 रोजी पोउपनि साईनाथ पुयड व त्यांचे पथकातील अंमलदार हे नांदेड शहरातील आसना नदी ब्रिज परीसरात असताना त्यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे त्यांनी भोकर जाणाऱ्या रोडवर भोकर फाटा येथील फ्रेन्ड्स मोटार गॅरेज जवळ सापळा रचुन छापा मारला असता दोन ईसम नामे 1. ईरन्ना गंगाधर नक्कलवाड वय 29 वर्ष व्यवसाय भंगार वेचणे रा नंदी नगर मुदखेड 2.मारोती प्रकाश

जिंकलवाड वय 31 वर्ष व्यवसाय भंगार वेचणे रा नंदी नगर मुदखेड ता मुदखेड जि नांदेड हे नगदी 1,75,8000/- रुपयांचे मुद्देमाला सह मिळुन आल्याने त्यांना विश्वासात घेवुन अधिक विचारपुस केली असता त्यांनी सांगितले कि,त्यांच्या ईत्तर साथीदारासह संगणमत करुन जांभळी शिवार,रिठा शिवार येथुन सोलार कपंणीचे सोलार प्लेटस जोडलेली वायर आणि उमरी अब्दुलापुर वाडी शिवार येथुन इलेक्ट्रीक केबल चोरी केली व हिमायतनगर येथील एका हॉटेलचे शटर तोडुन काउंटर मध्ये ठेवलेले नगदी 50,000/-रुपये आणि एका घरातील लग्नाचे कपडे चोरुन त्याव्दारे आलेले पैसे सर्वानी मिळून आपसात वाटप करुन घेतले आहेत असे सांगुन वरील सर्व गुन्हे संगणमताने केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपीतांना जप्त मुद्देमालासह पोलीस स्टेशन भोकर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

कार्यवाही करणारे.पोलीस अधिकारी व आमदार,

श्री अतुल भोसले पोलीस निरीक्षक स्था.गु.शा. नांदेड,श्री साईनाथ पुयड,पोलीस उपनिरीक्षक स्था.गु.शा.नांदेड,वं स्था.गुं.शा.नांदेड येथीलं पो. कॉ./ईम्रान शेख,प्रमोद जोंधळे,बालाजी कदम, संदीप घोगरे संतोष बेल्लूरडे, महेश बडगु,अमोल घेवारे, सायबर सेल येथील पो. हे.कॉ.राजू सिटीकर,दीपक ओढणे,

सदरची कामगिरी करणारे अधिकारी व अंमलदार यांचे मा.पोलीस अधीक्षक साहेब,नांदेड यांनी कौतुक केले आहे...



Post a Comment

0 Comments