Ticker

6/recent/ticker-posts

ग्रामसेविका दिपिका उगलमुगले यांची पिंपर्डे गावकऱ्यांना धमकी; ३ महिने दांडी!



गटविकास अधिकाऱ्यांकडे तक्रार;ग्रामसेविकाला निलंबित न केल्यास आंदोलनाचा इशारा 


*धड़गांव ता. प्रतिनिधी :- वसंत पावरा*

    गेल्या ३ महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालयात न येणा-या, आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या, जबाबदारी झटकणा-या, गावकऱ्यांचे प्रश्न न सोडवणा-या व श्री.दिनेश वाघ शिपाई यांना धमकी देऊन खोटे आरोप करणाऱ्या, गैरवर्तन करणाऱ्या श्रीमती दिपाली अरविंद उगलमुगले, ग्रामसेविका, ग्रामपंचायत पिंपर्डे ता.शहादा जिल्हा नंदुरबार यांना तात्काळ सेवेतून निलंबित करा,अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पिंपर्डे येथील संतप्त गावकऱ्यांनी व बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे. मागणीचे निवेदन गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना देण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, जगदीश डुडवे,विजय पावरा, दिनेश वाघ,पिंपर्डे शाखेचे गंगाधर पवार,शरद पवार, श्रावण वाघ, ईश्वर भील, एकनाथ पावरा, राहूल वाघ, प्रविण ईशी,सागर वाघ,सागर पावरा आदि असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

                   निवेदनात म्हटले आहे की, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी हा ग्रामपंचायतीचा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून ते गावातील महसूल गोळा करणे, शासकीय योजना राबवणे आणि पायाभूत सुविधांची अंमलबजावणी यांसारखी अत्यंत महत्त्वाची कामे पार पाडतात. ग्रामसेवक हा शासन व गावकरी यांच्यातील मुख्य दुवा आहे. गावातील जन्म, मृत्यू आणि विवाह यांची नोंद ठेवणे आणि रहिवासी दाखले, उत्पन्न प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रे देणे.ग्रामपंचायतीच्या सर्व नोंदी, अहवाल आणि महत्त्वाचे कागदपत्र सुरक्षित ठेवणे. गावकऱ्यांचे प्रश्न सोडवणे, ग्रामसभेत उपस्थित होणाऱ्या गावकऱ्यांच्या समस्यांचे निवारण करणे, इत्यादी कामांची महत्त्वाची जबाबदारी असते.

          परंतु, ग्रामसेविका श्रीमती दिपाली उगलमुगले ह्या गेल्या ३ महिन्यांपासून ग्रामपंचायत कार्यालय पिंपर्डे येथे येत नाहीत. उलट ग्रामपंचायत कार्यालयात नियमितपणे काम करणाऱ्या श्री दिनेश वाघ शिपाई यांच्या वर खोटे आरोप करत धमकी देत आहेत.असा गंभीर आरोप उपसरपंच घनश्याम मराठे यांनी केला आहे.दिपिका उगलमुगले ह्या आपली जबाबदारी झटकून कर्तव्यात कसूर करीत आहेत.तसेच गावकऱ्यांशी व कर्मचाऱ्यांशी उद्धटपणे बोलून व धमकी दमदाटी करून गैरवर्तन करत आहेत.हे ग्रामसेवक पदाला अशोभनीय वर्तन  करत आहेत.हे ग्रामपंचायतच्या हिताचे नाही.तु समोर भेट फक्त आता दाखवते तुला! तू विचार करून ठेव आता! असा धमकीचा मेसेज शिपाई दिनेश वाघ यांना ग्रामसेविका दिपिका उगलमुगले यांनी वाटसपवर पाठविला आहे.


Post a Comment

0 Comments