Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार शहर पोलिसांची मोठी कामगिरी; 'पैसे डबल'आमित दाखवून झालेल्या जबरी चोरीचा गुन्हा २४ तासांत उघड


 *नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह :-* 

        दि.१२-०६-२०२६ रोजी ते दि. १७-०६-२०२६ रोजी दरम्यान इंस्टाग्रामवर पैसे डबल करण्याचे रिल दाखवून पैसे लुटण्याचा प्रकार दि. १९-०६-२०२६ रोजी नंदुरबार शहरात घडला होता, त्यावरुन फिर्यादी यश संजय चव्हाण रा. खरखळा, मु. पो. वानगाव, ता. डहाणू जि. पालघर, मुळ रा. बाबतपुर, पडेगाव, ता. जि. वाराणसी, राज्य उत्तर प्रदेश यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यास दिलेल्या फिर्यादीवरुन अनोळखी चार इसमांविरुध्द नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुरनं. ६०३/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०९ (४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी यांनी फिर्यादी यश चव्हाण यांना इंस्टाग्राम अकाउंट वर पैसे डबल करण्याचे आमीष दाखवून पैसे डबल करण्यासाठी नंदुरबार येथे यावे लागेल असे सांगितले होते. त्यावरुन यश संजय चव्हाण व त्यांचा मामाचा मुलगा विशाल गुड्डु चव्हाण, रा. खरखळा, मु.पो. वानगाव, ता.डहाणू जि. पालघर असे पैसे डबल करण्यासाठी ५०,०००/- रुपये घेवून दि. १९-०६-२०२६ रोजी नंदुरबार रेल्वे स्टेशनवर उतरुन आरोपीस इसमास संपर्क करुन कुठे येऊ असे विचारल्याने त्यांनी नंदुरबार बस स्थानकावर बोलवले. तेथुन आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या मामाच्या मुलाला पॉलीटेक्नीक कॉलेज परिसरात एका निर्जन स्थळी घेवून गेले व तेथे चाकुचा धाक दाखवून त्यांना शिवीगाळ व मारहाण करुन त्यांच्या ताब्यातील ५०,०००/- रुपये रोख रक्कम व २०,०००/- रुपये किंमतीचा विवो कंपनिचा मोबाईल फोन जबरदस्तीने काढून घेवुन पळुन गेले.

      त्याप्रमाणे सदर गुन्ह्यातील अनोळखी आरोपींचा गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व अंमलदारा मार्फत शोध सुरु असतांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली कि, नमुद गुन्ह्यातील दोन आरोपी धान्य मार्केट परिसरात फिरत आहेत. अशी बातमी मिळाल्यावरुन गुन्हे शोध पथकाचे अधिकारी- अंमलदार यांनी सदर ठिकाणी जावून खात्री केली असता तेथे दोन इसम संशयित रित्या मिळुन आले, त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव शिवनाथ अशोक ठाकरे, वय २१ वर्षे, रा. जी.टी.पी. कॉलेज भिलाटी, नंदुरबार व त्याचे सोबत एक विधीसंगर्षग्रस्त बालक मिळुन आला, त्यांना ताब्यात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता नमुद इसमांनी सदर गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातून नमुद गुन्हयातील जबरीने चोरलेले ५०,०००/- रुपये रोख रक्कम व २०,०००/- रुपये किंमतीचा विवो कंपनिचा मोवाईल फोन तसेच गुन्हा करतांना वापरलेले हत्यार (चाकु), सदर गुन्हयात वापलेले ८०,०००/- रुपये किमतीचे वाहनासह एकूण १,५०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोहेका ६०६ नरेंद्र चौधरी हे करीत आहेत.

      सदरची कामगिरी ही मा. पोलीस अधीक्षक, नंदुरबार श्रीमती अश्विनी सानप, मा. अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार श्री. आशित कांबळे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी नंदुरबार श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. संदिप पाटील, नंदुरबार शहर पोलीस स्टेशन, पो.उपनिरी/भुनेश मराठे, पो.उपनिरी/अमोल देशमुख, पोहेकॉ/६०६ नरेंद्र चौधरी, पोहेकॉ/३२९ जगदीश पाटील, पोहेको / १०५० प्रशांत पाटील, पोकॉ/१२७८ आनंदा मराठे, पोकॉ/१२६२ राजेंद्र कटके, पोकों/ ४९९ ललित गवळी, पोकों/३६ अमित भरवाड, पोकों/५६३ राहूल राठोड, पोकों/२६ रुपेश पगारे व मपोकों /१३५६ निंबाबाई वाघमोडे सर्व नेम. नंदुरबार शहर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथक वांच्या पथकाने केली.


Post a Comment

0 Comments