जिल्हा .प्रतिनिधी - सागर काळे
केज तालुक्यातील आडस येथे लोकमाता राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त आयोजित भव्य मिरवणूकीस मान्यवरांनी उपस्थित राहून त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले.
तसेच अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे मनोभावे दर्शन घेतले. अहिल्यादेवींच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या लोककल्याणकारी, न्यायप्रिय आणि दूरदर्शी नेतृत्वाचा वारसा जपण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी अंबा सहकारी साखर कारखाना संचालक, श्री. ऋषिकेश भैय्या आडसकर, से.स.सो.लि. चेअरमन श्री उद्धव भाऊ इंगोले आदि मान्यवर व जयंती उत्सव कमिटीचे अध्यक्ष श्री.रोहित भैय्या कुकर, उपाध्यक्ष श्री. स्वप्निल तागड, व सुशील भैय्या होके रवी भैय्या ढवळे, वैभव तागड, तुकाराम लगसकर, अमोल नेमटे, समर्थ तांबवे दैनिक लोक युवा चे पत्रकार श्री.सागर भैय्या काळे यांच्यासह विविध मान्यवर, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित या सोहळ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. उपस्थितांनी त्यांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली आणि त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला.!

0 Comments