जिला प्रतिनिधी गणपति रॉय
बोळींज पोलीस ठाणे हद्दीत दिनांक २३/०५/२०२६ रोजी संध्याकाळी ०६.१५ वा च्या दरम्यान सायन्स गार्डन विरार पश्चिम, ता. वसई, जि. पालघर येथे दोन अनोळखी इंसम यांनी पैसे ए.टी.एम मध्ये ट्रान्सफर करायला मदत करा असे खोटे बोलून फिर्यादी यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन त्यांच्याकडील रुमालात बांधुन फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याची चैनीचा स्वतःच्या फायद्या करीता अप्रामाणिकपणे अपहार करुन फिर्यादी यांची फसवणुक केली आहे. फिर्यादी श्रीमती गुलाबपती राममिलन कहार, वय ६५वर्षे, यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, अनोळखी चोरट्या विरुध्द बोळींज पो. ठाणे गु.रजि.नं. १ २३०/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३१८ (४),३१७(२),३(५) प्रमाणे, दिनांक २४/०५/२०२६ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.
वृध्द महीलांना लक्ष करुन फसवणूकीचे प्रमाण वाढल्याने, मा. वरिष्ठांनी फसवणूकीचे गुन्हे उघडकीस आणणे बाचत सुचना दिल्या. त्याप्रमाणे बोळींज पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ गुन्हयांच्या घटनास्थळी भेट देवून गुन्ह्याचा कौल्यपूर्ण तपास केला असता आरोपीत हे फिर्यादीस बोलण्यात भासवून फसवणूक करुन घटनास्थळावरुन पळून गेल्याचे दिसून आले. आरोपीताचे मार्गावरील कौशल्यपूर्ण तपास केला असता, आरोपीत हे विरार रेल्वे स्टेशन येथून दादर रेल्वे स्टेशन येथे ट्रेनने प्रवास करुन त्यांनी दादर येथून अहमदाबाद बाजूकडे जाणारी ट्रेन पकडल्याचे दिसून आले. आरोपीत हे सरदार नगर, अहमदाबाद येथील असल्याची माहीती मिळाली. नमुद गुन्हयाचा तांत्रिक तपास केला असता, आरोपीत हा सायन व गोवंडी मुंबई परिसरात आल्याचे दिसून आल्याने आरोपीत नामे रतन प्रेमाभाई राठोड वय ३२ वर्षे, राहणार सरदारनगर, अहमदाबाद गुजरात यास गोवंडी परीसरातून ताब्यात घेऊन दिनांक ०५/०६/२०२६ रोजी २१.३६ वाजता अटक करण्यात आली. अटक आरोपीत याचेकडे केलेल्या तपासात सदर गुन्हयातील संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल कलोल, जिल्हा गांधीनगर, राज्य गुजरात येथील आरोपीत बलदेवजी ऊर्फ रमेश नागरजी ठाकोर, वय ५६ वर्षे पाचेकडून जप्त केला आहे.
तसेच आरोपीत यांचेकडे केलेल्या अधिक तपासात भांडुप पोलीस ठाणे, मुंबई गु.रजि.नं. 1 ४८७/२०२६, भा.न्या.सं. २०२३ चे कलम ३१८ (४), ३ (५) प्रमाणे हा गुन्हा उघडकीस आणून नमुद गुन्हयातील देखील संपूर्ण सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सदरची कामगिरी मा. श्री. निकेत कौशिक, पोलीस आयुक्त, मा. श्री. दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, मा. श्री. शशिकांत बोराटे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ०३, विरार, मा. श्री. सुनिल जायभाय, सहायक पोलीस आयुक्त, नालासोपारा, यांचे मार्गदर्शनाखाली श्री. प्रकाश कावळे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, बोळींज पोलीस ठाणे, व गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उप निरीक्षक/किरण बंजारी, पोलीस उप निरीक्षक/विष्णू वाघमोडे, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक/जनार्दन मते, सहा.पो.उपनिरी./संदीप मोकल, सहा. पो. उपनिरी. किशोर धनु, पोहवा/रोशन पुरकर, प्रफुल सरगर, निखिल मंडलीक, पोअंम/संदिप शेळके, तसेच पो.हवा./नामदेव ढोणे, नेम. पोलीस उप आयुक्त कार्यालय, परीमंडळ ३, विरार यांनी केलेली आहे.

0 Comments