Ticker

6/recent/ticker-posts

एकच धून 17 जून..



चिखली (प्रतिनिधी) विनोद इंगळे 


 मेवाडचे शूरवीर, हिंदू सूर्य म्हणून ओळखले जाणारे महाराणा प्रताप यांच्या 17 जून रोजी जयंतीनिमित्त चिखली शहरात विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

16 जून रात्री भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येणार आहे. सकाळी दुध अभिषेक आणि नंतर 

 हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, अनेक युवक-युवती उत्साहाने रक्तदान करावे असे  आव्हान हिंदू सूर्य महाराणा प्रताप जयंती समिती तर्फे करण्यात आले आहे. तसेच नागरिकांमध्ये देशभक्ती आणि एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

जयंतीनिमित्त काढण्यात येणारी भव्य मिरवणूक ही आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. सुप्रसिद्ध बँड पथकांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि पारंपरिक वेशभूषेत सजलेले सहभागी या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मिरवणुकीदरम्यान विविध ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करून जल्लोषपूर्ण वातावरण निर्माण केले जाणार आहे.

या सर्व कार्यक्रमांमुळे चिखली शहरात उत्सवाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले.



Post a Comment

0 Comments