Ticker

6/recent/ticker-posts

पाणी, रस्ता, वीज, शाळा, अंगणवाडी, दवाखाना व मातृ वंदना योजनेच्या मागणीसाठी बिरसा फायटर्सची जिल्हाधिकारी व सीईओ यांना निवेदने



धड़गांव प्रतिनिधी:  वसंत पावरा,

अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या मोठा तोलवापाडा,पाडावपाडा,टांगबारीपाडा,बेजपाडा,सापरीपाडा,बनखेतपाडा, पाटीलपाडा, या पाड्यात जलजीवन मिशन योजने अंतर्गत पाण्याच्या सोय करण्यात यावी,पिंपळखुटा ते मोठा तोलवापाडा व बर्डी आश्रमशाळा ते पिंपळखुटा टांगबारीपाडा रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करा, पाड्यात वीज पोहचवा, रस्त्याच्या कडेला दिवे बसवा, पाड्यात जिल्हा परिषद शाळा सुरू करा,लहान बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा, रूग्णांसाठी आशा सेविका नेमणूक करा, दवाखान्याची सोय करा, स्तनदा मातांसाठी मातृ वंदना योजनेचा लाभ द्या,अशा विविध मागण्यांसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांना निवेदन देण्यात आली. यावेळी अक्कलकुवा तालुका अध्यक्ष दिनेश वसावे, गुलाब सिंग वसावे,जेवंती वसावे, निलेश वळवी, अश्विन तडवी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

                         निवेदनात म्हटले आहे की,अक्कलकुवा तालुक्यातील ग्रामपंचायत पिंपळखुटा अंतर्गत येणाऱ्या पाडावपाडा,टांगबारीपाडा,बेजपाडा,सापरीपाडा,बनखेतपाडा, पाटीलपाडा, हे पांडे येतात. या पाड्यात ३५०० पेक्षा आदिवासी बांधव राहतात.अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा मधील पाडावपाडा,टांगबारीपाडा,बेजपाडा,सापरीपाडा,बनखेतपाडा, पाटीलपाडा, सारख्या दुर्गम भागात आदिवासी बांधव आजही थेंब थेंब पाण्यासाठी रानोरानी भटकावे लागते.येथील आदिवासी बांधवांना घाट उतरून व नदी ओलांडून पिंपळखुटा व मुख्य रस्ता पर्यंत जावे लागते.येथील काही मुले बर्डी आश्रमशाळा शाळेत शिकतात.लहान बालके व शाळकरी मुलांना घाट उतरून शाळेत जावे लागते.धोकादायक प्रवास करावे लागते.या भागात रस्ता अभावी ८ गरोदर महिला सह रूग्ण मरण पावले आहेत.म्हणून या पाड्यात पाणी,रस्ता,वीज,शाळा, अंगणवाडी, दवाखाना सोय करा व मातृ वंदना योजनेचा लाभ स्तनदा मातांना द्या, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments