Ticker

6/recent/ticker-posts

नंदूरबार जिल्हाधिकारी महोदया यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली सदिच्छा भेट.



जनहित,अल्पसंख्याक विकास,विकास कामे,आदी विषयांवर चर्चा


 नवापूर (प्रतिनिधी) पंकज अहिरे

नंदुरबार :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष अझर शेख यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी मा. जिल्हाधिकारी महोदया यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्यातील विविध जनहिताचे प्रश्न, विकासकामे तसेच अल्पसंख्याक समाजाशी संबंधित विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत निवेदन सादर करण्यात आले.

      मा. जिल्हाधिकारी महोदया यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकून संबंधित विषयांवर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष अझर शेख, युवा जिल्हाध्यक्ष विक्कीभाई बिर्हाडे, शहराध्यक्ष फरीद पठाण तसेच अॅड. असलम मलकानी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments