तळेगाव,ता. उमरी : गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा उमरी तालुका संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष,सामाजिक कार्यकर्ते डॉ.विक्रम देशमुख तळेगावकर यांचा वाढदिवस विविध सामाजिक, शैक्षणिक व क्रीडा उपक्रमांनी उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. तालुक्यातील नागरिक, विद्यार्थी, शिक्षक व युवकांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदविला.
वाढदिवसानिमित्त तळेगाव येथे दिव्यांग बांधवांना छत्री वाटप करण्यात आले. तसेच इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावी व बारावीच्या परीक्षेत संस्थेअंतर्गत विद्याभारती ज्युनिअर कॉलेज तसेच बापूसाहेब देशमुख माध्यमिक विद्यालय, तळेगाव येथील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या कु.अंकिता निवळे, सुप्रिया शिंदे, तौकीर पठाण,गणेश जाधव, तनुजा शिंदे, वैजयंती राखेवार, मिसबा शेख,या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
गोदावरी शिक्षण संस्थेच्या वतीने राबविण्यात आलेल्या “तळेगावची वारी, गगनभरारी” या उपक्रमात यश संपादन करणाऱ्या प्रशील खंडेलोटे, श्रुतिका किनेवाड,प्रथमेश उडतेवार अनुराधा पवार,आराध्या कवडीकर,समर्थ खंडेलोटे या विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच तालुकास्तरीय विमानवारी परीक्षेत संस्थेचे यशस्वी झालेले विद्यार्थी अजिंक्य माने, मयुरी कदम, गीतांजली तुपसाखरे, रुद्राणी जाधव या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याचा संस्थेचा नेहमीच प्रयत्न असल्याचे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.
वाढदिवसाचे औचित्य साधतं संस्थेच्या बापूसाहेब देशमुख प्राथमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या नवीन इमारतीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
तालुक्यातील क्रीडा प्रेमी साठी डॉ. विक्रम देशमुख मित्रमंडळाच्या वतीने स्व. राजेश देशमुख तळेगावकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या भव्य शॉर्ट बाऊंड्री क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना अत्यंत रोमांचक वातावरणात पार पडला. खलील एलेवेन नागपूर ने प्रथम तर बिलोली संघाने द्वितीय पारितोषिक जिंकले अंतिम सामन्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. ज्यात प्रथम पारितोषिक 61000/- रोख डॉ. विक्रम देशमुख, 41000/- शेख ताजोद्दीन मिस्त्री, 21000/- आरिफ (अनु) मिस्त्री, 15000/- सतीश देशमुख 11000/- रामू रेड्डी कप्पावार,, 11000/- संध्याताई राजेंद्र शिंदे, खलील सय्यद युवकांमध्ये क्रीडा संस्कृती वाढीस लागावी, हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. या सर्व उपक्रमास व्ही.पी. के. समूहाचे सीईओ संदीप पा. कवळे, विद्यार्थी संघटनेचे डॉ. अमोल पा.ढगे, जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब कौडगावकर, बीजीपी तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पा. सावंत, राज सेतू कॅन्स्ट्रक्शन चे मोरे साहेब,सतीशराव देशमुख चेअरमन से. सह.सो. तळेगाव , विश्वजीत देशमुख प्राचार्य , बालाजी पा. शिंदे, ज्ञानेश्वर पा. कदम, अविनाश पा. ढगे,गंगाधर पा. पुयेडं,शाहीर जंटल,सय्यद जाफर, बाबुराव खतगाये,राजेंद्र शिंदे,तळेगावचे मा.सरपंच गंगाधर शिगळे,रामू रेड्डी कप्पावार केदार अमृतवाड, हणमंत पबीतवार, मधुकर तुपतेवार,नवाज शेख, दिगंबर इंगळे,बालाजी नागलवाड,निवृत्ती कप्पावार, सुरेश गोटमुकले,गणेश पा. जाधव,निरंजन चामले,विठ्ठल पा. जाधव,मुजमिल बेग, आवेज बेग, अहेमद बेग, मा. उपसरपंच अयुब पठाण,सुभाष पुपुलवाड,प्रल्हाद पा. जाधव, रामचंद्र देष्टेवाड,माधव तुंबवाड, माधव अमृतवाड,बाजीराव पठाडे,रमेश हैबते, प्रवीण खंडेलोटे, प्रदीप खंडेलोटे,आदीजन उपस्थित होते.
दिवसभर चाललेल्या विविध उपक्रमांच्या माध्यमातून तळेगाव वासियांच्या वतीने घरोघरी साहेबांचे अभिष्टचिंतन करत डॉ. विक्रम देशमुख यांच्या वाढदिवसाचा समारोप उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आला. सामाजिक बांधिलकी, शैक्षणिक प्रगती आणि युवकांना प्रेरणा देणारे कार्य यामुळे त्यांच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
सर्व कार्यक्रमयश स्वीरित्या पार पडण्यासाठी शॉर्ट बाउन्ड्री क्रिकेट चे समिती अध्यक्ष जमील बेग, उपाध्यक्ष संभाजी पा. जाधव, समीर बेग, हुमेर बेग,सय्यद शाहरुख,अनिकेत खंडेलोटे,वसीम बेग,पंच सोन्या बापू भोसले , भास्कर वाघमारे, सामना समलोचक सचिन पा. वडगावकर आदी जणांनी परिश्रम घेतले

0 Comments