Ticker

6/recent/ticker-posts

उमरी तालुक्‍यातील जिरोणा येथे १०० टक्‍के स्‍वगणना पुर्ण .


तालुका प्रतिनिधी धाराजी  जोगदंड

उमरी- नांदेड जिल्‍हातील डिजीटल जनगणना मोहीमेला वेग आला असुन उमरी तालुक्‍यातील आदर्श गाव, स्‍मार्ट गाव, जिरोणा हे स्‍वगणना पुर्ण करणारे १६२ कुटूंब असलेले  पहिले गाव ठरले आहे.जिल्‍हाधिकाकरी श्री  राहुल कर्डिले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्‍या डिजीटल स्‍वगणना मोहिमेला जिरोणा गावातील नागरीकांनी उत्‍सुर्फत असा प्रतीसाद दिला. प्रशासन आणी ग्रामस्‍थ यांचा समन्‍वयातुन ही कामगिरी  शक्‍य झाली. 

आज रोजी जिरोणा गावात संकल्‍प – १०० %  स्‍वगणना जिरोणा गाव या करिता कॅम्‍पचे आयोजन तहसीलदार तथा चार्ज अधिकारी श्रीमती मंजुषा भगत यांच्‍या  संकल्‍पनेतुन करण्‍यात आले यावेळी सकाळी ०७ वाजता गावातील ग्रामस्‍थ, स्‍वंयसेवक, प्रगणक यांना एकत्र बोलवुन प्रत्‍येकांना घरे वाटुन देण्‍यात आली.

सेाबत श्री सतिश दर्शनवाड गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती उमरी, श्री राजेश्‍वर भुरे विस्‍तार अधिकारी (पं), पंचायत समिती उमरी, तथा फिल्‍ड ट्रेनर श्रीमती मंगला माने मॅडम, मंडळ अधिकारी, श्री संजय पेंदे  ग्रामपंचयत अधिकारी, महसूल सहायक श्री अशोक कस्‍तुरे, तांत्रिक सहाय्यक  धनंजय बोधनकर, अविनाश पिटलेवाड, स्‍थानिक प्रगणक श्री कलटेवाड सर व स्‍वंयसेवक ओमकार पुपूलवाड, साईप्रसाद चुनूपवाड, राजेश व मंगेश कोलेवाड, आकाश व प्रविण काळेराव, संगणक ऑपरेटर यांनी नियोजन बध्‍द पध्‍दतीने काम केले यामध्‍ये गावातील सरपंच श्रीमती सुशीला दर्शनवाड उपसरपंच सौ ललीता साईनाथ येगलेवाड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

दरम्‍यान उमरी तालुक्‍यातील इतर गावातील नागरिकांनीही १५ मे २०२६ पर्यंत स्‍वगणना प्रक्रीया पुर्ण करुन डिजीटल माहिमेत  सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन तहसीलदार तथा चार्ज अधिकारी श्रीमती मंजुषा भगत यांनी केले आहे

Post a Comment

0 Comments