Ticker

6/recent/ticker-posts

चकाचक रस्त्यावर लागतोय कचऱ्याचा ढीग; परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका



बदलापूर प्रतिनिधी

बदलापूरात पालिकेकडून कचरा नियमित उचलला जात असेल तरी बदलापूर मधील काही रस्त्यांवरती कचऱ्याचे ढीग दिसून येत आहे बदलापूर मधील तुलसी विहार नामांकित सोसायटीसमोर असलेल्या परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा, राडारोडा जमा झाला आहे. भटकी श्वान व जनावरामुळे अनेकदा हा कचरा रस्त्यावरती येत असतो त्यामुळे हा परिसर बकाल झाला आहे.चकाचक रस्त्यावर लागतोय कचऱ्याचा ढीगा मुळे परिसरात दुर्गंधी आणि आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे आता काही दिवसांनी पावसाला सुरुवात होणार असून पावसात कचरा साचू लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढू शकतो व रोगराई पसरू शकते. 

त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कचरा उचलणे आणि हा परिसर स्वच्छ करणे गरजेचे आहे. त्यामुळे पालिकेच्या वतीने ही समस्या सोडवावी असे परिसरातील नागरिक मागणी करत आहे  स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरात सर्वत्र स्वच्छता केली जाते आणि परिसर स्वच्छ राखा, असे आवाहनही सर्वांना पालिकेकडून केले जाते विशेषता या सोसायटीच्या बाहेरील परिसरात स्कूल बस स्टॅन्ड व समोरील बाजूला स्पोर्ट्स अकॅडमी असून या परिसरात मोठ्या प्रमाणात वर्दळ असते यामुळे हा परिसर स्वच्छ ठेवण्याची पालिकेबरोबरच स्थानिक नागरिकांची सुद्धा जबाबदारी आहे


Post a Comment

0 Comments