Ticker

6/recent/ticker-posts

कलावंतांच्या सक्षमीकरणाची चळवळ गावखेड्या पर्यत पोहचवा. ॲड.श्याम खंडारे,



यवतमाळ  प्रतिनिधी :- 

राष्ट्रसंत तूकडोजी महाराज कलावंत वारकरी सेवा विकास व सन्मान संस्था तालूका शाखा वणी, मारेगाव, झरी-जामणी शाखा तर्फे आयोजित कलावंत मार्गदर्शन व सन्मान मेळावा दि.23 मे रोजी वणी येथील शेतकरी भवन,नानासाहेब गोहोकार सभागृह मधे हजारो कलावंतांच्या ऊपस्थितीमधे  संपन्न झाला.कार्यक्रमाचे 

अध्यक्षस्थानी कलावंत समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲड.श्याम खंडारे होते.ऊदघाटक, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मा.ॲड.देविदासजी काळे ,व प्रमूख अतिथी मा.संजयभाऊ खाडे होते.

तिनही तालूक्यातील  मानधन धारक  जेष्ठ कलावंतांचा सन्मान ह्या प्रसंगी अतिथींच्या हस्ते  झाला.कलावंताना संबोधित करतांना ॲड श्याम खंडारे ह्यांनी  सांगीतले की येत्या तीन वर्षात कलावंतांच्या प्रत्येक कूटूंबातील किमान एकाला पाच हजार रूपये प्रतिमाह मानधन सूरू करणे, गावखेड्यातून पंढरपूरला जाणा-या दिंडीला विस हजार रूपये ,आणि भजन मंडळाला  साहित्याकरीता पंचविस हजार रूपये शासनाचे अनूदान ह्या तिनही  योजनांचे  लाभ मिळवून देण्यासाठी नियोजन बध्दपणे कलावंत समिती कार्य करीतआहे.

कलावंतांनी आपल्या कलेचा दर्जा ऊंचावून  दर्जेदार मानधन प्रस्ताव शासनाला सादर करून आपल्या ऊत्कृष्ट कलागूणांवर मानधनासाठी निवड होईल यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेत, पैशाच्या अपहारातून  मानधन  मिळविण्याची कीड सध्या ह्या योजनेला लागली आहे, त्यातून बेगडी कलावंतांची  निवड होत आहे,खरे कलावंत मागे पडत आहेत.ह्या अनिष्ट प्रक्रीये विरोधात आपणास लढा द्यावा लागणार आहे, काही हितशत्रू कलावंतांची सेवा, हितरक्षण व सक्षमीकरण चळवळीला गतिरोधक लावायचे काम करीत आहेत,आपली फसवणूक होवू देवू नका त्यांचे पासून सावध रहा असा सल्ला दिला.व कलावंत संघटनेची ताकद गावखेड्यापर्यत पोहचवा असे आवाहन केले.ह्या प्रसंगी तीनही तालूक्यातील तीस  मानधन धारक जेष्ठ कलावंतांचा अतिथीच्या शूभ हस्ते सन्मानपत्र ,शाल ,श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. संजय भाऊ खाडे,

ॲड.देविदासजी काळे,वंदना ताई आवारी,प्रथम फौडेशन चे प्रमोद कांबळे,राज्य महासचीव गंगाधरजी घोटेकर ,हरिश्चंद्र बल्की तालूकाध्यक्ष झरी जामणी,जेष्ठ कलावंत किसनरावजी मते ह्यांची मार्गदर्शनपर भाषणे झालीत,ख्यातनाम प्रबोधनकार व गायक रमेश भाऊ वाघमारे व ऊतकृष्ट ढोलकी वादक हंसराज तलवारे ह्यांच्या कलासंचानी वंदनीय राष्ट्रसंतानी रचलेली गिते व सावित्रीआई च्या जिवन कार्यावरील गित गायनाने  कलावंतांमधे प्रेरणा व ऊर्जा निर्माण केली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश भाऊ सिडाम तालूकाध्यक्ष मारेगाव ह्यांनी केले.संचलन बाबारावजी कूडमते ह्यांनी तर आभार वणी तालूकाध्यक्ष चंपतराव पाचभाई ह्यांनी  मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी तिनही तालूक्यातील भजन मंडळांनी परिश्रम घेतले.राष्ट्वंदना घेवून कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमाला वणी,मारेगाव ,झरी जामणी येथून हजारो  कलावंतांची ऊपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments