Ticker

6/recent/ticker-posts

ओझर येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त धम्म रॅली व स्नेह भोजन उत्साहात संपन्न

 



ओझर (प्रतिनिधी) जुबेर शेख 

: बुद्ध पौर्णिमेनिमित्त मिलिंद मित्र मंडळ, राजवाडा यांच्या वतीने ओझर शहरात भव्य धम्म रॅली व स्नेह भोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडला.

दि. 01 मे 2026 रोजी सायंकाळी धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सायं. ६.०० ते ९.३० या वेळेत पार पडलेल्या या रॅलीत शहरातील विविध भागातून नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. “प्रज्ञा, शील, करुणा” या संदेशाचा प्रसार करत रॅलीत बौद्ध बांधवांसह युवक, महिला व ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

यानंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. रात्री ९.३० ते १०.०० या वेळेत बुद्ध विहार समोर, मिलिंद नगर, राजवाडा येथे हा कार्यक्रम पार पडला. उपस्थित नागरिकांनी स्नेह भोजनाचा लाभ घेतला.

सदर कार्यक्रम हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव २०२६-२७ निमित्त आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मिलिंद मित्र मंडळ तसेच स्थानिक कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.


Post a Comment

0 Comments