Ticker

6/recent/ticker-posts

आशा चाईल्ड डेव्हलपमेंट संस्थेला आयएसओ मानांकन प्रमाणपत्र प्राप्त

 



रुस्तम शेख यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी :-

गेल्या 4 वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील स्वमग्न (Autism) तसेच हायपर अक्टिव्ह(ADHD) मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आशा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर या संस्थेला नुकतेच ISO 9001:2015 मानांकन प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे.

संस्थेचे संचालक डॉ. दीपक घरझोडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, मागील चार वर्षांत सुमारे 250 ऑटिझमग्रस्त मुलांवर उपचार व समुपदेशन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

या यशामध्ये संस्थेच्या कार्यसंघाचे महत्त्वपूर्ण योगदान असून श्वेता ठाकरे, संजय महाले, डॉ. कंचन गानजुडे, ऋषभ शिंदे, डॉ. प्रमोद आडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. तसेच मार्गदर्शक म्हणून डॉ. संजीव जोशी यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी नमूद केले.

आशा चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर ही संस्था केवळ उपचारापुरती मर्यादित न राहता पालकांना मार्गदर्शन, समुपदेशन आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवत असून, समाजात ऑटिझमबाबत जनजागृती करण्याचेही कार्य करत आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विविध स्तरातून संस्थेचे कौतुक होत आहे.


Post a Comment

0 Comments