किल्ले धारूर; चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
आगामी काळातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एका बुतावर १५ ते २० कार्यकर्त्यांचे संघटन कसे उभा करता येईल, यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी पक्ष वाढीसाठी वेळ देणे गरजेचे आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जनतेच्या संपर्कात राहणे गरजेचे आहे, जनतेची कामे लोकप्रतिनिधीपर्यंत पोहोचवावित यामुळे पक्ष संघटना वाढण्यास मदत होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याचे आवाहन आ. प्रकाश सोळंके यांनी केले.
धारूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अ.प.ग.) यांच्या वतीने रविवारी दि.१७ मे रोजी आर्या फंक्शन हॉल येथे संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीत आ. प्रकाश सोळंके यांनी कार्यकत्यांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माझी सभापती जयसिंग सोळंके, राष्ट्रवादीचे माजलगाव विधानसभा अध्यक्ष जयदत्त नरवडे, कल्याण
अबुज, न.प. उपाध्यक्ष सय्यद शाकेर, तालुकाध्यक्ष अमोल जगताप, माजी नगराध्यक्ष शेषराव फावडे, लक्ष्मण सिरसट, न.प.गटनेते नितीन शिनगारे सहसंवाद बैठकसर्व सन्माननीय नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी, माजी सैनिक संघटना तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments