विजय भोईर यांनी वर्षानुवर्षे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश.
प्रतिनिधी - सयाजी चव्हाण
दिवा - दिवे करांसाठी आनंताची बातमी ... भारतीय जनता पार्टी दिव्याचे अभ्यासु नेतृत्व व आता तरी जागा हो दिवेकर या संघटनेचे विजय भोईर यांनी वर्षानुवर्षे केलेल्या सतत पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
या अगोदर दिवा शहर आणि मुंब्रा या दोन शहरांसाठी 400612 हा एकच पिनकोड होता. यामुळे नागरिकांना खूप अडचणींना सामोरे जावे लागत होते. दिव्यातील नागरिकांना महत्त्वाच्या कामांसाठी मुंब्राला जावे लागत होते.तसेच इतर तांत्रिक अडचणी व महत्त्वाचे डॉक्युमेंट डिलिव्हरी यांसाठी खूप अडचणी येत होत्या...
यामुळे दिवा शहराला स्वतंत्र पिनकोड मिळावा यासाठी विजय भोईर यांनी गेले कित्येक वर्षे सातत्याने पाठपुरावा केला आहे. आणि त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.त्यांनी केंद्राकडे सतत केलेल्या पाठपुराव्यामुळे आज अखेर केंद्राकडून दिवा शहरासाठी स्वतंत्र पिनकोड 400611 हा देण्यात आला आहे.नागरिकांकडून सोशल मीडिया वरती विजय भोईर यांचे कौतुक व आभार प्रकट केले जात आहे.

0 Comments