Ticker

6/recent/ticker-posts

*पेट्रोल- डिझेलचा साठा करून ठेवणा-यांवर कडक कारवाई करा-बिरसा फायटर्सची मागणी*



अक्राणी प्रतिनिधी , वसंत पावरा:-

    पेट्रोल व डिझेलचा साठा करून ठेवणा-या पेट्रोल पंप व साठवणूकदार यांच्यावर  कायदेशीर कडक कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.निवेदनात म्हटले आहे की,सध्या पेट्रोल व डिझेल टंचाईच्या अफवेमुळे जिल्हात अनेक ठिकाणी पेट्रोल पंप चालक व साठवणूकदार बेकायदेशीर इंधन साठा करून ठेवत आहेत.पेट्रोल व डिझेलचे ३ रूपयांनी  भाव  वाढण्याच्या २-३ दिवस अगोदर पेट्रोल व डिझेल शिल्लक असतानाही काही पेट्रोल पंप चालक यांनी पेट्रोल व डिझेल शिल्लक नाही.असे बोर्ड लावून पेट्रोल पंप बंद ठेवले व ३ रूपयांनी पेट्रोल व डिझेल वाढल्यानंतर लगेच पेट्रोल पंप चालू केले.

                     नंदुरबार जिल्ह्यात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनचालकांमध्ये मोठी धावपळ उडाली आहे. शहरासह ग्रामीण भागातील अनेक पेट्रोल पंपांवर सोमवारी सकाळपासून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले.इंधनपुरवठा खंडित होणार असल्याच्या चर्चांनी अचानक जोर धरल्यानंतर नागरिकांनी दुचाकी,चारचाकींसह थेट ड्रम, कॅन आणि मोठे कंटेनर घेऊन पेट्रोल पंपांवर गर्दी केली. त्यामुळे काही तासांतच अनेक पंपांवरील इंधनसाठा संपला असून काही ठिकाणी 'पेट्रोल-डिझेल समाप्त'चे फलक लावण्याची वेळ आली.जिल्ह्यात  इंधनटंचाई निर्माण होणार असल्याच्या अफवांमुळे नागरिकांनी गरजेपेक्षा अधिक इंधन खरेदी करण्यास सुरुवात केली. सकाळपासूनच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा वाढत गेल्या आणि दुपारपर्यंत परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे. काही ठिकाणी वाहनचालकांमध्ये किरकोळ वादावादी झाल्याच्याही घटना घडल्या. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे पंपचालकांचीही मोठी तारांबळ उडाली आहे.

                         ड्रम-कॅनमध्ये इंधन साठवण्याकडे कल अनेक नागरिकांनी भविष्यात इंधन मिळणार नाही या भीतीने प्लास्टिक कॅन, ड्रम आणि मोठ्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल भरून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे काही पेट्रोल पंपांनी मर्यादित प्रमाणात इंधन देण्याचा निर्णय घेतला. तर काही ठिकाणी साठा संपल्याने पंप तात्पुरते बंद ठेवावे लागले. नियमित वाहनचालकांना तासनतास रांगेत उभे राहूनही इंधनासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे.म्हणून  पेट्रोल व डिझेलचा साठा करून ठेवणा-यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व तशा सूचना सर्व पेट्रोल पंप धारकांना देण्यात याव्यात, अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या कडे करण्यात आली आहे.


Post a Comment

0 Comments