नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह -
जनगणनेचे काम करत असताना प्रगणक म्हणून कार्यरत असलेल्या शिक्षकावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केल्याची घटना शहरातील तळोदा रोड परिसरात घडली.या हल्ल्यात शिक्षक जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धेश्वर माध्यमिक विद्यालय वाघोदा ता. नंदुरबार जि नंदुरबार येथील उपशिक्षक अनिल निंबा पाटील हे जनगणनेचे काम करत होते.रविवार दि. 24 मे 2026 रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजेच्या सुमारास ते राज सिटी-2, तळोदा रोड परिसरात माहिती संकलनासाठी गेले होते.
यावेळी अंधाराचा फायदा घेत अचानक काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यात एका कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाला चावा घेतल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव सुरू झाला.अचानक झालेल्या या प्रकारामुळे शिक्षक घाबरून गेले.जखमी अवस्थेत त्यांनी तत्काळ नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालय येथे धाव घेत उपचार घेतले. सुदैवाने वेळेत उपचार मिळाल्याने पुढील धोका टळला आहे.
दरम्यान, शहरात भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा समोर आला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला

0 Comments