बदलापूर प्रतिनिधी/ प्रसाद दिकरराव :
चिखलोली धरण हे अंबरनाथ शहरासाठी पिण्याच्या पाण्याचे प्रमुख स्रोत मानले जाते. लाखो नागरिकांचा दैनंदिन पाणीपुरवठा या धरणावर अवलंबून असताना अशातच अंबरनाथ–बदलापूर तापमानाचा पारा 40 अंश सेल्सिअस पुढे गेला असून तापमानाचा वाढलेला पारा आणि पाण्याचे होणारे बाष्पीभवन यामुळे राज्यभरातील जलसाठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट होते आहे. अंबरनाथ शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलसाठ्यांमध्येही झपाट्याने घट होते आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन कोलमडते आहे. अंबरनाथ शहराचे स्वतःचे चिखलोली धरण आहे. स्वतःचे धरण असलेली अंबरनाथ एकमेव नगर परिषद असावी. या चिखलोली धरणातून अंबरनाथच्या पूर्व भागातील शिवाजीनगर, महालक्ष्मी नगर, आंबेडकर नगर, श्रीकृष्ण नगर आणि नवरे नगर परिसरातील सुमारे ५० हजारांहून अधिक नागरिकांना दररोज ६ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो.
मात्र, सध्या वाढत्या तापमानामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने आटत असल्याने, आगामी दिवसांत या परिसरातील रहिवाशांना पाणीटंचाईचा मोठा फटका बसण्याची चिन्हे दिसत आहे धरणात सध्या उपलब्ध असलेला जलसाठा ऑगस्ट महिन्यापर्यंत पुरवणे अपेक्षित असल्याने, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या वतीने पुढील आठवड्याभरात पाणीपुरवठ्यावर निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून आणि काटकसरीने करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.image.png

0 Comments