किल्लेधारूर :प्रतिनिधी चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
किल्लेधारूर शहरात सुरक्षेच्या दृष्टीने चौका चौकात सी.सी.टीव्ही कॅमेरे बसवून कार्यान्वित करावेत. सदरील सी.सी.टीव्ही उच्च दर्जाचे व कायम स्वरुपी असावेत. यामुळे शहरातील चोऱ्यांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. तसेच शहरातून खामगाव -पंढरपूर महामार्ग गेल्याने वाहतूक प्रचंड वाढली असून भरधाव वाहनामुळे अनेक अपघात होउन कित्येक जणांना आपला जिव गमवावा लागला आहे. वेग नियंत्रीत ठेवण्यासाठी घाटपाटी ते चिंचपूर रोड पर्यंत तसेच आडस रोडला धारूर ते श्रीकृष्ण इंग्लिश स्कूल या मार्गावर योग्य ठिकाणी गतिरोधक बसवणे आवश्यक आहेत. शहरात नवीन रस्ता बसस्थानक ते काशिनाथ चौक ते हनुमान मंदिर कसबा विभाग यावर गतिरोधक बसवण्यात यावेत अशी मागणी कृषी उत्पन्न बाजार समितिचे संचालक तथा प्रतिष्ठित व्यापारी संदीप भैय्या शिनगारे यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकातून प्रशासनाला केली आहे.

0 Comments