Ticker

6/recent/ticker-posts

कळंब येथे महात्मा ज्योतिबा फुले यांचे जयंती निमित्त व्याख्यान

 


रुस्तम शेख  यवतमाळ जिल्हा  प्रतिनिधी  :- 

दिनांक 11 एप्रिल 2026 रोजी शनिवार  ला सुप्रसिध्द व्याख्याते, लेखक तथा सामाजिक विचारवंत  मा. चंद्रकांतजी झटाले रा.अकोला यांचे जाहीर व्याख्यान गांधी चौक कळंब येथे  आयोजित करण्यात आले होते.  महात्मा ज्योतिबा फुले जन्मोत्सव समिती कळंब  तर्फे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी चंद्रकांत झटाले यांनी महात्मा फुले यांच्या विचारांची व शिकवणुकीची गरज बहुजन समाजाला कीती महत्त्वाची आहे. हा विचार परखडपणे आपल्या खास  शैलीत श्रोत्यांसमोर मांडला. 

            कार्यक्रमाची सुरवात  सावित्रीबाई फुले महिला मंडळातर्फे वंदन गीताने केली. प्रास्ताविक प्रा. गायत्री नवाडे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय बसवेश्वर माहुलकर यांनी करुन दिला. व्याख्याते मा. चंद्रकांतजी झटाले यांचा सत्कार आयोजन समितीच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन समितीचे मार्गदर्शक बाळासाहेब फाळके  यांचेहस्ते करण्यात आला. 

                आपल्या व्याख्यानातून चंद्रकांत  झटाले यांनी       महात्मा फुले यांनी फक्त स्त्री शिक्षणासाठी शाळाच काढल्या नाही तर महात्मा फुले यांनी सामजिक, राजकीय तथा इतरही क्षेत्रात भरीव कार्य केले. फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली,छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर पहिला पोवाडा लिहिला. शेतकऱ्याचा आसुड, गुलामगिरी,ब्राम्हणाचे कसब ई. ग्रंथसंपदा आपल्या सर्वांसाठी उपलब्ध करुन गेले याचा प्रत्येक बहुजन समाजाला अभिमान असला पाहिजे.आणि प्रत्येकाने याचे वाचन करून महात्मा फुले व सावित्रीआई फुले यांचे विचार आपल्या जीवनात अमलात आणावे .तसेच भोंदु बुवा- बाजी यावर प्रखर टीका केली.तसेच महात्मा जोतीराव फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नाने समाजातील जात पात भेदभाव नष्ट झाले आहे. तरी राजकारणी लोक जाती-पातीत भांडणे लाऊन आपला स्वार्थ साधतात.यापासुन बहुजन समाजाने सावध रहावे,असे आवाहन केले. बहुजन समाजाने व महिला वर्गाने शिक्षणाला प्राधान्य देऊन अंधश्रद्धेमुळे आलेल्या भ्रामक कल्पनांचा त्याग करावा. असे आवाहन केले.

            तसेच छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहु महाराज, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर,संत ज्ञानेश्वर महाराज,संत तुकाराम महाराज,राष्ट्रपिता महात्मा गांधी,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज,कर्मयोगी संत गाडगे महाराज यांचे कार्य बहुजन समाजासाठी किती महत्वाचे आहे या बाबत मार्गदर्शन केले.

  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुषार काळे यांनी केले. तर आभारप्रदर्शन अर्चनाताई हजारे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीततेसाठी महात्मा फुले जन्मोत्सव समितीचे प्रवीण हजारे, अरविंद हजारे, निलेश नवाडे, महेंद्र ओंकार,राजु सारडे, निलेश हजारे, गिरीश बेले ,सुधिर खसाळे, प्रशांत काळे,अनिल धोबे, वेदांत तडस आदिंनी व सावित्रीबाई फुले मंडळाच्या सर्व सदस्या तथा परिसरातील नागरिकांनी प्रयत्न केले. कार्यक्रमासाठी पत्रकार बंधु, परिसरातील नागरीक, महीला, युवावर्ग तथा फुले शाहु आंबेडकर अनुयायी यांनी गर्दी केली होती.. असे समितीचे वतीने महेंद्र ओंकार यांनी कळविले आहे.

Post a Comment

0 Comments