किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
*शिक्षण संवाद यात्रा*
मातंग समाजातील अधोगती मागची कारण म्हणजे शिक्षणा बद्दलची अनास्था. शिक्षण न घेतल्यामुळे आज समाजात खूप दयनीय अवस्था आहे, तसेच आर्थिक परिस्थिती बिकट होण्यामागे शिक्षण हेच मुख्य कारण आहे. आज शिक्षण न घेतल्यामुळे चांगले काय व वाईट काय यातील फरक न समजल्यामुळे व्यसनाधीनता वाढली आहे .समाजात नोकरवर्ग दुर्मिळ पाहायला मिळतात,मातंग समाजामध्ये शिक्षणाची जनजागृती व्हावी म्हणून काढलेली शिक्षण यात्रा.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणारा संपूर्ण देश. बाबासाहेबांनी संदेश दिला शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा. संपूर्ण भारत देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानावर चालतो, परंतु शोकांतिका आहे बाबासाहेब ज्या शेड्युल कास्ट मधून येतात त्यातील एक जात म्हणजे मातंग समाज ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले आहे त्या पद्धतीमध्ये आज मातंग समाजामध्ये शिक्षणाचे महत्व जाणून घेणारे फार क्वचित लोक आहेत. मातंग समाजातील संपूर्ण लोकांचे जीवन ऊस तोडणी मिस्त्री च्या हाताखाली जाणे असेच रोजचे जीवन चालू आहे. हे कुठेतरी थांबले पाहिजे आणि आपल्या समाजातील लेकरे शिकून शासनाच्या मोठमोठ्या नोकरी पदावर असायला पाहिजे. हा उद्देश मनात धरून मातंग समाजातील चळवळीचे नेते आणि समाजाला जागृत करणारे अमोल भैया शेरकर यांनी जी शिक्षण संवाद यात्रा बीड जिल्ह्यात काढलेली आहे. त्यामागचा उद्देश एकच आहे की माझ्या समाजातील गरीबातील गरीब मुलगा मुलगी हे सुद्धा शासनाच्या सर्वोच्च पदी असावे आणि आपल्या समाजाची मान त्यांनी उंच वावी. यासाठी ते अहोरात्र प्रयत्न करत आहेत. त्याच निमित्ताने माझ्या समाजाला शिक्षणाचे महत्व समजावे म्हणून आणि माझ्या साठे नगर मधून सुद्धा अनेक अधिकारी व्हावे यासाठी चेतन भैया लोखंडे शिक्षण यात्रा साठे नगर कसबा विभागातील काढावी यासाठी ते प्रयत्नशील होते. अमोल भैया शेरकर धारूर येथील कसबा विभागात आले असता मातंग समाजातील युवा पिढीला मार्गदर्शन करताना.
सोबत प्राध्यापक राम लोखंडे सर, रमेश खरात सर प्राध्यापक वाघमारे सर, रंजीत पाटोळे सर, नागेश वैरागे सर, तसेच साठे नगर मधील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

0 Comments