Ticker

6/recent/ticker-posts

उपअधिक्षक भुमिअभिलेख कळंब यांच्या कडून शासण आदेशाची पायमल्ली :- शिस्तभंगाची कार्यवाही करा रुस्तम शेख यांची मागणी



 यवतमाळ प्रतिनिधी :- 

काही वेळा बाहेरील व्यक्ती कर्मचारी असल्याचे भासवून नागरिकांची फसवणूक करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेत ओळखपत्र (आयडी कार्ड) दर्शनी भागावर लावणे बंधनकारक केले असुन त्याबाबत सामान्य प्रशासन विभागाने  दिनांक १० सप्टेबर २०२५ रोजी परिपत्रक निर्गमित केले आहेत. 

राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात प्रवेश करतांना आणि कार्यालयात असतांना तसेच क्षेत्रीय भेटीत सुद्धा आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावावे असे आदेश देण्यात आले आहे.

. तसेच  कार्यालयात प्रवेश करतांना आणि कार्यालयात असतांना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर न लावणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागयांनी आदेशात नमूद केले आहे . तसेच ओळखपत्र न लावल्यास संबंधित कर्मचारी, अधिकारी यांच्या वर  शिस्तभंगाची कार्यवाही करण्याची तरतुद आहे

 परंतु  काही कार्यालयांतील  कर्मचारी या आदेशा कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असुन  अधिकारी कार्यालयात खुर्चीवर बसले  असताना सुद्धा दर्शनी भागावर ओळखपत्र  लावत नसून आदेशाची  सर्रासपणे पायमल्ली करीत असल्याचे उघडकिस आले आहे.

याबाबत सविस्तर सांगायचे झाल्यास कळंब येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक यांनी असतांना  दर्शनी भागात   कार्यालयाचे ओळखपत्र लावलेले नाही . त्या मुळे उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय कळंब यांनी शासन परिपत्रकाचे उल्लघंन  केले आहे .कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी कार्यालय प्रमुखाची  आहे  परंतु कार्यालय प्रमुख जर आदेशाचे उल्लंघन करीत असेल तर ते कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यावर नियंत्रण कसे ठेवणार अशी सर्वसामान्य जनते  मध्ये चर्चा आहे.

 सबंधित   उपअधीक्षक  भूमी अभिलेख कार्यालय कळंब  यांनी कर्तव्याचे पालन तसेच शासण आदेशाचे पालण करण्यास कसूर केल्या बद्दल यांच्या वर महाराष्ट्र नागरीक सेवा (शर्ती  व अपिल ) नियम 1979 अन्वये  शिस्तभंगाची कारवाई करावी  अशी मागणी राष्ट्रीय क्रांतिकारी विचार महासंघाचे मुख्य संयोजक रुस्तम शेख यांनी केली आहे.   जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या कडे तक्रार करणार असल्याची माहिती रुस्तम शेख यांनी दिली आहे .

Post a Comment

0 Comments