किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचाजन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू (डॉ. आंबेडकर नगर) येथे झाला पूर्ण नाव भीमराव रामजी आंबेडकर शिक्षण कोलंबिया युनिव्हर्सिटी आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्र आणि कायद्यात उच्च शिक्षण शिक्षणप्रती समर्पणः बालपणातील जातीय भेदभावाविरुद्ध त्यांनी शिक्षणाला शस्त्र बनवले संविधान निर्मिती मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून भारतीय राज्यघटनेची रचना केली सामाजिक समताः अस्पृश्यता निवारण आणि दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली.महिला सक्षमीकरणः महिलांना शिक्षणाचे आणि मालमत्तेचे हक्क मिळवून देण्यासाठी संघर्ष केला
मजुरांसाठी कामाचे तास निश्चित करणे व इतर सुधारणा केल्या,असे मुख्याध्यापक(हनुमंत केदार)सर यांनी आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांना सांगत छान मार्गदर्शन केलेकिल्ले धारूर वीर पांडुरंग चौक येथे असलेली विद्यानिकेत प्राथमिक शाळेतील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली.. तसेच उपस्थित मुख्याध्यापक हनुमंत केदार सर, गणेश काळे सर, चंद्रकांत वाघमारे सर, लाखे सर, गांधले मॅडम, रेखा पारवे आदीमान्यवर उपस्थित होते.

0 Comments