वार्ताहर
नळणी बु येथे पतंजली योग पीठ द्वारे आयोजित निशुल्क योग प्रणायाम शिबिरात पंचक्रोशी तील हजारोच्या संखेतील लोकांनी सहभाग नोंदवाला निशुल्क योग शिबिराची सुरुवात 1आक्टोबर ते 5आक्टोबर या कालावधी ठेवण्यात आला होता, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हूणन,योगशिक्षक श्री प्रल्हाद हरबक माऊली, डॉ के एन शिंदे व केटी इंगळे सर यांची उपशिति होती.योगशिक्षक प्रल्हाद हरबक यांचे नियोजक कृष्णा बोर्डे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
प्रमुख उपस्थित प्रल्हाद हरबक माऊली यांनी योगाचे मानवी जीवनातील योगाचे महत्व पटवून दिले, आजच्या धकाधकीच्या व ताण-तणावाच्या जीवनात शरीर निरोगी व मन शांत ठेवण्यासाठी योग हाच एकमेव उत्तम मार्ग असे त्यांनी सांगितले त्यानंतर प्राणायाम सूर्यनमस्कार आणि विविध योगासने प्रात्यक्षिके दाखविले त्यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील तरुण-तरुणी व ग्रामस्थांनी अत्यंत शिस्तवद्य पद्धतीने योग्य अभ्यास केला कार्यक्रमाच्या शेवटी तरुण-तरुणींनी आणि गावकऱ्यांनी दररोज किमान 25 ते 30 मिनिट योग करण्याचा संकल्प केला. आयोजक श्री विजय लोहिया , रविभाऊ जाधव बाळू भाऊ जाधव समाधान बोर्डे भरत जाधव त्यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताच्या कार्यक्रमाने पाच दिवसीय निशुल्क योग प्राणायाम शिबिराचे समारोह झाला. यासाठी गावकऱ्यांनी विशेष सहकार्य केले, या पाच दिवशी शिबिरामुळे मानवी शरीरामध्ये बदल झाल्यामुळे गावकऱ्यामध्ये उत्साह वाढला होता यापुढेही नियमित योगा करून शरीर तंदुरुस्त ठेवू अशी आशा आता गावकऱ्यांच्या बोलण्याच्या भावनेतून दिसून येत आहे.या निशुल्क योग शीबिरात महिलांचा सहभाग वाखान्या जोगा होता.

0 Comments