Ticker

6/recent/ticker-posts

खापरदरी येथील सामाजिक कार्यकर्ते स्व. गजानन गोरसिंग आडे यांचे निधन



दै. लोकयुवा  (जगदीश . राठोड)

मानोरा :ग्राम खापरदरी येथील रहिवासी तथा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणारे *स्व. गजानन गोरसिंग* *आडे* यांचे दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच खापरदरी गावावर शोककळा पसरली असून, त्यांच्या आप्तेष्टांसह ग्रामस्थ, मित्रपरिवार आणि परिचितांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

स्व. गजानन आडे यांनी आपल्या साध्या, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाने अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. सामाजिक कार्याची तळमळ, प्रत्येकाशी आपुलकीने वागण्याची वृत्ती आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर राहण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे ते सर्वांच्या जिव्हाळ्याचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या जाण्याने एक प्रेमळ माणूस, एक आधारवड आणि समाजहिताची तळमळ असलेला कार्यकर्ता कायमचा हरपला आहे.

त्यांच्या पश्चात अर्धांगिनी, दोन मुले व चार मुली असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मिक निधनाने आडे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात संपूर्ण खापरदरी गाव सहभागी आहे.

माणूस जातो, पण त्याच्या आठवणी, त्याचे विचार आणि त्याने जपलेली माणुसकी सदैव जिवंत राहते. स्व. गजानन आडे यांच्या प्रेमळ आठवणी त्यांच्या कुटुंबीयांच्या तसेच ग्रामस्थांच्या हृदयात कायमस्वरूपी राहतील.

ईश्वर त्यांच्या पवित्र आ त्म्यास चिरशांती लाभो आणि आडे परिवाराला हे अपार दुःख सहन करण्याची शक्ती देवो, हीच समस्त खापरदरीवासीयांची भावपूर्ण प्रार्थना.भावपूर्ण श्रद्धांजली!

Post a Comment

0 Comments