Ticker

6/recent/ticker-posts

दसऱ्यानिमित्त कुस्ती स्पर्धा; २५० कुस्त्यांमध्ये मल्लांचा सहभाग



दैनिक लोकयुवा प्रतिनिधी फैजान खान 

जव्हार : जव्हारच्या संस्थानकालीन परंपरेचा वारसा जपणाऱ्या जव्हार येथे नगर परिषद आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने बुधवारी कुस्त्यांचे जंगी सामने उत्साहात पार पडले. दरबारी दसऱ्यानंतर दुसऱ्या दिवशी जुन्या राजवाड्याच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या या कुस्ती स्पर्धेला पालघर जिल्ह्यासह विविध भागांतून आलेल्या कुस्तीप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळाला.यात २५० कुस्त्यांमध्ये मल्लांचा सहभाग झाला होता.

     नाशिक, त्र्यंबकेश्वर, शिर्डी, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, भिवंडी, कल्याण, चाळीसगाव, जव्हार आणि मोखाडा येथील पैलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एकूण २५० कुस्त्या खेळविण्यात आल्या. विजयी पैलवानांना १ हजार, ३ हजार आणि १० हजार रुपयांपर्यंत रोख पारितोषिके व प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले.

   सागर अहिरे, गिरीश जिंदा, गणेश बनेके, सागर बेडकुळे, भूषण पाटील, इगतपुरीचे प्रसाद कोरडा, जव्हारचे उमेश बनेके आणि राजूर येथील पैलवानांसह अनेक मल्लांनी कुस्तीच्या आखाड्यात आपले कौशल्य दाखविले. विजेत्यांना उपनगराध्यक्ष कुणाल उदावंत, पाणीपुरवठा समिती सभापती इमरान मेमन, नगरसेवक कुशल सहाने, माजी उपजिल्हाप्रमुख विजय घोलप, सामाजिक कार्यकर्ते राजू महाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक निलेश घोलप, अनंता घोलप आणि कुस्ती समितीचे पदाधिकारी यांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली.


Post a Comment

0 Comments