Ticker

6/recent/ticker-posts

श्री.काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी

 










नंदुरबार (प्रतिनिधी) मोईनोद्दीन शाह :-


श्री.काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात

     हिरा प्रतिष्ठान संचलित श्री काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी प्राथमिक विद्यामंदिर व संस्कृती शिशुविहार यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळाष्टमीनिमित्त दहीहंडी कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रम व सांस्कृतिक सादरीकरणातून गोकुळाष्टमीचा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला.


कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यामंदिराचे मुख्याध्यापक युवराज भामरे उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी भगवान श्रीकृष्ण व राधेच्या आकर्षक वेशभूषेत सहभागी होत उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गरबा नृत्याने तसेच कृष्णभजनांच्या जयघोषाने संपूर्ण विद्यालय परिसर भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणाने भारून गेला.


गोकुळाष्टमीनिमित्त आयोजित या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख करून देण्याबरोबरच सामूहिक सहभाग, आनंद आणि सांस्कृतिक मूल्यांचा संदेश देण्यात आला.


कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व वर्गशिक्षक, शिक्षिका तसेच विद्यामंदिरातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.


Post a Comment

0 Comments