महाराजस्व समाधान शिबिरासाठी दिलेल्या वाहनांचे थकीत 39 हजार रुपये तत्काळ देण्याची मागणी.
भूम (कुणाल लगाडे)
भूम मध्ये दि. 16 सप्टेंबर 2026 तहसील कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या महाराजस्व समाधान शिबीरामध्ये वापरण्यात आलेल्या वाहनांचे भाडे अद्याप मिळाले नसल्याने वाहनमालकांनी तहसील प्रशासनाकडे थकीत रक्कम देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यामध्ये भूम तालुक्यातील AIMIMचे तालुका अध्यक्ष तथा चालक-मालक वाहतूक संघटनेचे अध्यक्ष आदम अमीन पिरजादे यांनी उपविभागीय अधिकारी, भूम यांना याबाबत निवेदन दिले आहे.निवेदनानुसार, वाशी तालुक्यासाठी 7, भूम तालुक्यासाठी 7 आणि राखीव 5, अशी एकूण 19 वाहने समाधान शिबिरासाठी भाडे तत्त्वावर लावलेली होती . प्रत्येक वाहनासाठी एका दिवसाचे 2,100 रुपये भाडे ठरविण्यात आले होते. त्यानुसार 19 वाहनांचे एक दिवसाचे एकूण 39,900 रुपये भाडे थकीत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सदर वाहनांचे भाडे अद्याप मिळाले नसल्याने वाहनमालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत आज दीड महिना होऊन गेले तरी देखील वाहनाचे भाडे मिळत नसल्याने सदर वाहनाचे चालक सतत माझ्या घरी येऊन भाडे मागत आहे त्यामुळे मला मानसिक त्रास देखील होत आहे पैसे आल्यानंतर बघू असे म्हणत मला जाणून बुजून मला त्रास देत आहे.तरी सर्व वाहनांचे थकीत भाडे तात्काळ देण्यात यावे, अशी मागणी आदम अमीन पिरजादे यांनी केली आहे. तसेच रक्कम न दिल्यास 28 सप्टेंबर 2026 रोजी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी धाराशिव, तहसीलदार भूम आणि पोलीस निरीक्षक भूम यांना देखील देण्यात आल्या आहेत.

0 Comments