पालघर,जिल्हा प्रतिनिधी केविल पाटील
पालघर दि. १३ ऑगस्ट: सायबर गुन्ह्यांचे वाढते प्रमाण, अमली पदार्थांच्या व्यसनामुळे होणारे दुष्परिणाम तसेच वाहतूक नियमांचे पालन आणि रस्ता सुरक्षेबाबत नागरिक, विद्यार्थी व पालकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी पालघर जिल्हा पोलीस दलाच्या वतीने विशेष जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९.०० ते दुपारी १२.०० वाजेपर्यंत जिल्हा नियोजन समिती हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर येथे आयोजित करण्यात आली आहे.
कार्यशाळेत सायबर फसवणुकीपासून संरक्षणाचे उपाय, ऑनलाइन व्यवहार करताना घ्यावयाची काळजी, अमली पदार्थांच्या व्यसनाचे दुष्परिणाम व त्यापासून दूर राहण्यासाठीचे मार्गदर्शन, तसेच वाहतूक नियमांचे पालन, हेल्मेट व सीटबेल्टचे महत्त्व आणि रस्ता सुरक्षेसंदर्भातील विविध बाबींवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
पालघर जिल्ह्यातील नागरिक, विद्यार्थी, पालक तसेच विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा पोलीस दलाने केले आहे. सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असून सुरक्षित व जागरूक समाज घडविण्याच्या दृष्टीने ही कार्यशाळा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

0 Comments