आरिफ खान पठाण प्रतिनिधी,लोकयुवा न्यूज मेळघाट
मेळघाट धारणी,
मा. भारत निवडणूक आयोगाने जाहिर केलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम 30 जून 2026 पासून ते 8 ऑगष्ट 2026 कार्यक्रमानुसार 41- मेळघाट विधानसभा अंतर्गत धारणी तालुका व धारणी शहर सर्व मतदारांमध्ये जनजागृती करणे व कार्यक्रमाला राहीलेला अत्यंत अल्प काळ पाहता व कोणताही मतदार या अभियातून वंचीत राहू नये या दृष्टीने आज दिनांक 05 ऑगस्ट 2026 रोजी मा. सहाय्यक जिल्हाधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी श्री सिद्धार्थ शुक्ला ( भा. प्र. से.) यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसिलदार श्री प्रदीप शेवाळे यांच्या नियोजनातून धारणी शहरात पंचायत समिती कार्यालयापासून ते धारणी शहराचे दुसरे टोक समजल्या जाणाऱ्या मधवा नाला पुलापर्यंत भव्य विशेष सखोल पुनरिक्षण जनजागृती रॅलीचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
सदर जनजागृती रॅलीमध्ये तहसीलदार प्रदीप शेवाळे, पोलिस निरीक्षक अवतारसिंह चव्हाण, निवडणूक नायब तहसीलदार राजेश माळी, महसूल नायब तहसीलदार आकाश चव्हाण, तसेच पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी श्री सिडाम, सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे सहाय्यक अभियंता श्री सौरभ ठाकूर, तसेच धारणी येथील नगरसेवक यांचे सोबत तहसिल कार्यालय धारणी, पंचायत समिती धारणी यांचे सोबतच तालुका मुख्यालयातील बहुतेक कार्यालयातील कर्मचारी, पर्यवेक्षक, मतदान केंन्द्रस्तरीय अधिकारी यांनी सहभाग घेतला शिवाय धारणी येथील ज्ञानमंदिर कन्या विदयालयातील वर्ग 8 ते 10 चे विदयार्थी यांचे सह विदयालयातील सर्व शिक्षकवृंद व कर्मचारी यांनी जनजागृती रॅली मध्ये आपला सहभाग नोंदवीला.
आयोजकातर्फे रॅलीमध्ये ध्वणीक्षेपाव्दारे विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम ( S. I. R. ) कार्यक्रमाची माहिती, महत्व व सर्व नागरिकांना स्वत: या अभियानामध्ये सहभागी होण्याबाबत आवाहन करण्यात आले शिवाय जनजागृती करीता विविध घोषणा सुध्दा या जनजागृती रॅली मध्ये देण्यात आल्या. प्रशासनाव्दारे करण्यात आलेल्या या आयोजनाचे नागरिकाकडून स्वागत करण्यात आलेले असून या व्दारे निश्चितच नागरिकांचा सहभाग वाढण्यास याव्दारे मदत होणार आहे. या जनजागृती अभियानाव्दारे तहसिलदार श्री प्रदीप शेवाळे यांनी धारणी तालुक्यातील व शहरातील सर्व नागरिकांना B.L.O. ( मतदान केंन्द्रस्तरीय अधिकारी ) यांचेशी संपर्क साधून आपला फार्म भरुन घ्यावे असे आवाहन केले आहे.
.jpg)
0 Comments