{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
नांदेड-नांदेड राज्यात मान्सून कालावधीत संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाडा क्षेत्रांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल,( SDRF ) धुळे येथील एक तुकडी नांदेड या ठिकाणी 1जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत सुसज्ज साधनसामग्रीसह तैनात करण्याबाबत समादेशक तथा नियंत्रण अधिकारी, ( SDRF ) राज्य आपत्ती प्रतिसाद दल,धुळे यांना शासनाने आदेश दिले होते. त्याआदेशानुसार आर.डी. पवार पो.नि.यांच्यासह 3 अधिकारी व 33 अंमलदार अशी एक तुकडी 1जुलै रोजी नांदेड येथे तैनात झाली आहे.
मागील चार वर्षापासुन मान्सून कालावधीत संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मराठवाडा क्षेत्रांसाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दल,धुळे ( SDRF ) येथील एक तुकडी नांदेड येथे तैनात केली जात आहे.तर नागपूर येथील एक तुकडी गडचिरोली जिल्हयात तैनात केली जात आहे.मागील वर्षी मुखेड,देगलूर, धर्माबाद,नायगांव,नांदेड, अर्धापुर सह नांदेड जिल्हयातील पुरपिडीत भागात या तुकडीने मोठया प्रमाणात शोध व बचाव कार्य केलेले आहे.मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ऑगस्टमधील पुरपरिस्थितीमध्ये एका दिवसामध्ये 386 पुरग्रस्तांचे शोध व बचाव कार्य या तुकडीकडुन केले आहे. त्याचबरोबर नांदेड सोबतच परभणी,लातुर, हिंगोली या जिल्हयातही शोध व बचाव कार्य या तुकडीकडुन केले गेलेले आहे.यावर्षीही तुकडी मराठवाडा क्षेत्रासाठी सुसज्ज साहित्यानिशी नांदेड येथे तैनात झालेली आहे.
आज या SDRF तुकडीने जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण राहुल कर्डिले, यांची भेट घेऊन रिर्पोटींग केले.या दरम्यान जिल्हाधिकारी नांदेड यांनी त्यांना सर्तक,सुसज्ज राहुन आपत्तीला शिघ्र प्रतिसाद दयावा. तसेच नांदेड जिल्हयातील 16 तालुक्यातील स्थानीक शोध व बचाव पथक तसेच आपत्तीशी निगडीत यंत्रणा/ विभांगाना प्रशिक्षण देण्याच्याही सुचना दिल्या आहेत.
या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण किरण अंबेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुऱ्हे, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, धुळेचे ( SDRF ) टिम कमांडर आर.डी.पवार सपोनि सुरेश बगाड,सुरेश शंकपाळ,राहुल अवचार,आपत्ती व्यवस्थापनचे सहायक बारकुजी मोरे आदींची उपस्थिती होती. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नांदेड,पोलिस,मनपा,स्थानीक शोध व बचाव पथक यांच्या समन्वायातून राज्य आपत्ती प्रतिसाद दल धुळे येथील या तुकडीच्या मदतीने या मान्सून कालावधीत पुरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे व यातील पुढचा टप्पा स्थानीक शोध व बचाव पथकाच्या कृती प्रशिक्षणाचा घेतला जाणार आहे...!

0 Comments