(भाग्यनगर गुन्हे शोध पथकाची उल्लेखनीय कामगिरी)
{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
नांदेड|नांदेड श्री.नीलाभ रोहन,पोलीस अधीक्षक नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने सी.सी.टी.व्ही., गोपनीय व तांत्रीक माहितीच्या आधारे चोरीच्या गुन्ह्याचा यशस्वी तपास करून आरोपींकडून सुमारे 24 लाख रुपये किमतीचे 160 ग्राम तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.
गुन्हे शोध पथकातील पो.उपनि/विनोद देशमुख व त्यांच्या पथकातील अधिकारी-कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारा मार्फत गोपनीय माहिती मिळाली की, श्रीनगर परिसरात काहि संशयित महिला फिरत आहेत.त्यानुसार तात्काळ कारवाई करून संबंधित महिलांना ताब्यात घेण्यात आले.सी.सी.टी.व्ही.फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे तसेच चौकशी दरम्यान त्या पोलीस स्टेशन भाग्यनगर गुन्हा क्र.09/2026,कलम 303(2), 3(5) बी.एन.एस. मधील संशयित असल्याचे निष्पन्न झाले.पुढील सखोल चौकशीत त्यांनी चोरीचा गुन्हा कबूल केल्याने चोरीतील 160 ग्राम सोन्याचे दागिने पोलिसांनी त्यांच्याकडून जप्त केले.
या प्रकरणात लक्ष्मी गणेशराव साखरे उर्फ मंजू रेड्डी (वय 46 वर्षे) भोपाळ,मध्यप्रदेश ह.मु. चिखलठाणा,छत्रपती संभाजीनगर व पूजा सोनू उर्फ लक्केप्पा साखरे (वय 26 वर्षे) ह.मु.चिखलठाणा, छत्रपती संभाजीनगर या दोन्ही आरोपी महिलांना अटक करण्यात आली असून,त्यांच्याकडून चोरीतील 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई श्री.नीलाभ रोहन,पोलीस अधीक्षक,श्री सूरज गुरव,अपर पोलीस अधीक्षक, नांदेड,रामेश्वर वैजंने, पोलीस उप अधीक्षक नांदेड (शहर) यांच्या मार्गदर्शनाखाली,पोलीस निरीक्षक श्री.संतोष तांबे,श्री.महेश माळी,पोलीस निरीक्षक (गुन्हे),गुन्हे शोध पथकातील पो.उपनि/विनोद देशमुख,पो.उपनि/नरेश वाडेवाले,पोहेकॉ/विशाल माळवे,पोकॉ /विष्णुकांत मुंडे,सुधाकर मलदोडे, राजीव घुले,नागनाथ चापके,राहुल लाटकर, आदनान पठाण व अंकुश कांबळे यांनी केली...!

0 Comments