जिला प्रतिनिधी गणपति रॉय
अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक सुदर्शन मुमक्का यांची महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, महाराष्ट्र स्पेशल फोर्स तसेच स्मार्ट अहमदनगर न्यूजच्या प्रतिनिधींनी सदिच्छा भेट घेत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन करीत असलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले.
भेटीदरम्यान नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलीस दल अत्यंत जबाबदारीने आणि तत्परतेने काम करत असल्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. दिवस-रात्र जनतेच्या सेवेसाठी कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या समर्पित सेवेमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ होत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
ही भेट महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य शासन गृह विभाग सदस्य राहुल भैय्या दुबाले, राज्य सचिव योगेश भैय्या कदम, राज्य सल्लागार अंकुश भैय्या पवार, राज्य सचिव (लीगल सेल) ॲड. आदर्श जाधव सर, महाराष्ट्र स्पेशल फोर्सचे वरिष्ठ अधिकारी विशाल हंकारे तसेच महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना शेवगाव तालुका अध्यक्ष व महाराष्ट्र स्पेशल फोर्स अहिल्यानगर जिल्हा निरीक्षक दीपक मोहिते सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
यावेळी स्मार्ट अहमदनगर न्यूजचे मुख्य संपादक नासिर सय्यद आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना व महाराष्ट्र स्पेशल फोर्सचे अधिकारी विकासभैय्या शेलार यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
चर्चेदरम्यान जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी आणि नागरिकांना अधिक विश्वासार्ह व पारदर्शक सेवा देण्यासाठी पोलीस प्रशासन करीत असलेल्या प्रयत्नांचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच पोलीस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी सामाजिक संघटना आणि प्रसारमाध्यमे सकारात्मक भूमिका बजावतील, अशी ग्वाही देण्यात आली.
अल्पावधीतच आपल्या कार्यशैलीमुळे पोलीस दलात शिस्त, कार्यक्षमता आणि जनतेप्रती उत्तरदायित्वाची भावना अधिक दृढ होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला. अहिल्यानगर जिल्हा अधिक सुरक्षित, सक्षम आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने आदर्श बनविण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या प्रत्येक उपक्रमाला समाजाचा पाठिंबा राहील, असेही यावेळी नमूद करण्यात आले.जनतेची सुरक्षा, कायद्याचे राज्य आणि नागरिकांचा विश्वास हीच पोलीस प्रशासनाची खरी ताकद आहे. या ध्येयाने कार्य करणाऱ्या पोलीस दलाच्या पाठीशी समाज कायम उभा राहील,"** अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

0 Comments