Ticker

6/recent/ticker-posts

शासनाची संवेदनशीलता आणि नेतृत्वाची तत्परता – यावरच जनतेचा विश्वास उभा असतो.”

 शासनाची संवेदनशीलता आणि नेतृत्वाची तत्परता – यावरच जनतेचा विश्वास उभा असतो.”

Inbox


vinod ingle <vinodingle5544@gmail.com>

Fri, Jun 12, 5:24 PM (17 hours ago)

to me




चिखली,  प्रतिनिधीविनोद इंगळे— 

नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासन संवेदनशीलतेने कार्य करत असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. चिखली विधानसभा मतदारसंघातील ढालसावंगी येथील आपत्तीग्रस्त शेतकरी श्री. शिवाजी तुकाराम खार्डे यांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तब्बल 1 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे.

  शेतातील जनावरांच्या गोठ्याला आग लागून पशुधनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या घटनेमुळे शेतकऱ्याचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले होते. मात्र, या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत.

चिखली विधानसभा क्षेत्राच्या लोकप्रिय आमदार मा. सौ. श्वेताताई महाले यांनी या प्रकरणात विशेष लक्ष घालत तात्काळ मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर केला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे संबंधित शेतकऱ्याला मुख्यमंत्री सहायता निधीतून 1 लाख रुपयांची मदत मंजूर झाली आहे.

या मदतीमुळे आपत्तीग्रस्त शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळाला असून त्याच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळणार आहे. या निर्णयाबद्दल शेतकरी व स्थानिक नागरिकांनी शासनाचे तसेच आमदार श्वेताताई महाले यांचे आभार व्यक्त केले आहेत.

ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना तात्काळ मदत देण्याचा शासनाचा हा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना व्यक्त होत आहे. अशा प्रकारच्या निर्णयांमुळे शेतकऱ्यांचा शासनावरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचेही नागरिकांनी नमूद केले..


Post a Comment

0 Comments