किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
माधव तात्या निर्मळ एक प्रेमळ आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात नेहमी घर करून राहणारे उत्तुंग व्यक्तिमत्व आहे. सतत गोरगरीब जनतेला प्रत्येक प्रकारचे सहकार्य करून गोरगरीब जनतेसाठी आधार बनलेले माधव तात्या निर्मळ यांचा १२ जून वाढदिवस. या वाढदिवसानिमित्त माधव तात्या निर्मळ यांना गोर गरीब जनतेचा नेहमीच आशीर्वाद असतो. बीड जिल्ह्यात माधव तात्या निर्मळ यांची वेगळीच छाप आहे. आज माजलगाव मतदार संघामध्ये राजकारणाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीच्या मनात तात्यांनी घर केले आहे. तात्याला भेटण्यासाठी गेल्यानंतर तात्या प्रेमाने हसत खेळत सर्वसामान्य जनतेची अडचण सोडवतात त्यांना धीर देतात चहापाणी करून त्यांच्या समस्या
ऐकतात त्यामुळे तात्या बद्दल जनतेमध्ये एक आपला माणूस अशी भावना निर्माण झालेली आहे. सध्याच्या राजकीय आणि जातीय परिस्थितीत तात्यांनी कधी ही कोणत्याही व्यक्तीची जात पाहिली नाही फक्त माणूस म्हणून त्या व्यक्तीला नेहमीच आधार देण्याचे काम केलेले आहे. राजकारणामध्ये विविध प्रकारचे पद असतानाही कधीही ते राजकारणी म्हणून वागताना दिसत नाहीत. सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून ते सतत लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात. त्यांच्या वागण्यात व बोलण्यात कधीही गर्व नसतो. माजलगाव मतदार संघामध्ये गावागावात निर्मळ तात्याची वेगळ्याच प्रकारची क्रेझ आहे. सर्वसामान्य जनतेच्या मनातला कार्यकर्ता म्हणून आहे जी क्रेझ आहे त्या क्रेजमुळे भलेभले राजकारणी हातबल झालेले दिसून येतात.
उत्तुंग व्यक्तिमत्व असणाऱ्या कार्यकर्त्याचा वाढदिवस या वाढदिवसानिमित्त माधव तात्या निर्मळ यांना खूप खूप शुभेच्छा.

0 Comments