{नांदेड जिल्हा प्रतिनिधी-शेख अनिस}
नांदेड- महाराष्ट्र शासनाने राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि पदोन्नत्याचे आदेश जारी केले असून त्यात नांदेड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक पदावर डॉ. निलाभ रोहन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते यापूर्वी हिंगोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते.तर नांदेडचे विद्यमान पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांची पुणे,शहर पोलीस दलात पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.या बदल्यामध्ये नागपूर शहराच्या पोलीस आयुक्तपदी ज्येष्ठ आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील,यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ते यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत होते.नागपूरचे विद्यमान पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली करण्यात आली आहे.प्रमुख बदल्या अपर पोलीस महासंचालक श्रेणी विश्वास नागरे पाटील- पोलीस आयुक्त नागपूर शहर,रविंद्र सिंगल-
अपर पोलीस महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,पोलीस महासंचालक श्रेणी,संजय वर्मा-पोलीस महासंचालक पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळ,अर्चना त्यागी,-पोलीस महासंचालक,न्यायिक व तांत्रिक विभाग,विशेष पोलीस महानिरीक्षक / पोलीस उपमहानिरीक्षक
श्रेणी-दत्तात्रेय शिंदे,-पोलीस महानिरीक्षक राज्य गुन्हे अभिलेख विभाग पुणे,{पदोन्नती}संजय शित्रे,-अंपर पोलीस आयुक्त मिरा-भाईदर वसई विरार,आयुक्तालय.पोलीस अधीक्षक /पोलीस उपायुक्त सत्तर.डॉ.निलाभ रोहन, पोलीस अधीक्षक नांदेड अभिनाश कुमार,पोलीस उपायुक्त पुणे शहर,श्रेणीकं लोंढा,-पोलीस अधीक्षक हिंगोली,रूपाली अबुरे,-पोलीस अधीक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षामहामंडळ,शशिकांत सातव,-पोलीस उपायुक्त,छत्रपती संभाजी नगर शहर,रमेश धुमकाळ,पोलीस उपायुक्त नागपूर शहर,पियुष जगताप,अपर पोलीस पोलीस अधीक्षक,खामगाव बुलढाणा,नारायण शिरगावकर-समादेशकं, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.19.कुसळगाव, प्रांजली सोनावणे,पोलीस उपायुक्त अमरावती शहर,व पदोन्नती नवदीप अग्रवाल,यांची वरिष्ठ समय श्रेणीत पदोन्नती देतं राज्यपालाचे परिसाह्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.राज्य शासनाच्या गृह विभागाने जारी केलेल्या या सर्व आदेशावर सहसचिव सुग्रीव धपाटे,यांनी स्वाक्षरी केली आहे.या फेरबदलामुळे अनेक जिल्हे व शहराच्या पोलीस प्रशासनात नव्या नेतृत्वाची सुरुवात होणार आहे.विशेषतः नांदेड जिल्ह्यात डॉ.निलाभ रोहन यांच्या नियुक्तीमुळे कायदा व सुव्यवस्थेच्या. कामकाजालानवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे..!
.jpg)
0 Comments