Ticker

6/recent/ticker-posts

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघ निवडणूक २०२६

 


जिला प्रतिनिधी गणपति रॉय 

आतापर्यंत २ उमेदवारांकडून ५ उमेदवारी अर्ज दाखल; मंगळवारी अर्जांची छाननी होणार

पालघर, मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांतून होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीअंतर्गत (२०२६), ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी संस्था मतदारसंघासाठी आतापर्यंत एकूण २ उमेदवारांनी ५ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ही माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. आज अभिजीत अंकुश पवार (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष – शरद पवार गट) आणि रवींद्र फाटक (शिवसेना) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत होती. या अंतिम दिवशी, २ उमेदवारांकडून एकूण ५ उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. दाखल करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी मंगळवार, २ जून २०२६ रोजी केली जाईल.

Post a Comment

0 Comments