शहाणा ते बोरपाणी रस्त्याच्या चौकशीची मागणी; कार्यकारी अभियंता शहादा यांना निवेदन
*अक्राणी ता. प्रतिनिधी :- वसंत पावरा*
शहाणा ते बोरपाणी ४ किलोमीटर रस्त्याचे तात्काळ खडीकरण व डांबरीकरण करा,४ किलोमीटर पैकी फक्त १ किलोमीटर पर्यंत केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाका अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्या कडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, कोषाध्यक्ष पप्पू अवाया, शहाणाचे जगदीश डुडवे सह काही कार्यकर्ते उपस्थित होते.
शहादा तालुक्यातील शहाणा ले बोरपाणी या रस्त्याची खूपच दुरवस्था झालेली आहे. रस्ता मंजूर होऊनही फक्त १ किलोमीटर रस्त्याचे थातूरमातूर खडीकरण व डांबरीकरण ठेकेदाराने निष्कृष्ट काम गेल्या १ वर्षांपूर्वी केले होते ,तेही उखडले आहे.उर्वरीत ३ किलोमीटरच्या रस्त्याचे काम अपूर्ण सोडलेले आहे. अपूर्ण कामाचा निधी हडप केल्याचा संशय आहे. त्यामुळे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. रस्ता खड्डे मय असल्याने या रस्त्यावरून प्रवाशी प्रवास करण्यास टाळाटाळ करतात.या रस्त्याचे बारा वाजले आहेत. रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था आहे. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे. रस्त्यावर खोल खड्डे झाले आहेत. या रस्त्यावरून गरोदर महिला, वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

0 Comments