Ticker

6/recent/ticker-posts

लाडकी बहीण योजनेत घुसले १४ हजार भाऊ; कडक वसुलीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत



जिल्हा  प्रतिनिधी  .सागर काळे

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या पडताळणी प्रक्रियेत तब्बल ८० लाख अर्ज अपात्र ठरल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबई येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भातील अधिकृत आकडेवारी जाहीर केली. यामध्ये सर्वात मोठी आणि धक्कादायक बाब म्हणजे महिलांच्या या योजनेचा लाभ घेणारे तब्बल १४ हजार 'पुरुष' (लाडके भाऊ) चौकशीत उघड झाले आहेत. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणे, चुकीची माहिती देणे आणि निकषांची पूर्तता न करणे यामुळे ही मोठी अपात्रता झाली आहे.

योजनेच्या पारदर्शकतेसाठी शासनाने परिवहन विभागाचा चारचाकी वाहनांचा डेटाबेस आणि वार्षिक उत्पन्नाची माहिती तपासली असता हा गैरप्रकार समोर आला. तब्बल ५ लाख अर्जदारांकडे स्वतःची चारचाकी वाहने असल्याचे आणि अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले आहे.

फसवणूक करून पैसे लाटणाऱ्या सर्व १४ हजार पुरुषांकडून सरकार कडक पावले उचलत पूर्ण रक्कम वसूल करणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, कोणत्याही खऱ्या भगिनीकडून पैसे परत घेतले जाणार नाहीत. सध्या १ कोटी ७० लाख पात्र महिलांना या योजनेचा नियमित लाभ मिळत राहील. तसेच तांत्रिक कारणांमुळे ज्यांची ई-केवायसी अपूर्ण राहिली आहे, त्यांच्यासाठी सरकार पुन्हा एकदा नवीन विंडो खुली करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे.



Post a Comment

0 Comments