ओझर (प्रतिनिधी जुबेर शेख)
: ओझर ग्रामपंचायतीत कर्मचारी म्हणून आपल्या सेवेला सुरुवात करून प्रामाणिकपणा, कर्तव्यनिष्ठा आणि अथक मेहनतीच्या जोरावर ग्रामपंचायत अधिकारी पदापर्यंत मजल मारणारे युसुफ गुलाब शेख हे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवानिवृत्तीमुळे ग्रामपंचायत प्रशासनातील एक अनुभवी, अभ्यासू आणि लोकाभिमुख अधिकारी सेवेतून निवृत्त झाले आहेत.
आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात युसुफ गुलाब शेख यांनी ग्रामपंचायत प्रशासन, विविध विकासकामे आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांबाबत अत्यंत जबाबदारीने व समर्पित भावनेने काम केले. शांत, संयमी आणि सर्वांना आपलेसे वाटणारे अधिकारी म्हणून त्यांनी ओझर परिसरातील नागरिकांमध्ये विशेष ओळख निर्माण केली.
त्यांच्या कार्यकाळात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अनेक विकासात्मक उपक्रम राबविण्यात आले. तसेच प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय राखत गावाच्या विकासात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या कामकाजातील पारदर्शकता, वेळेचे नियोजन आणि सर्वसामान्यांशी जपलेले सौहार्दपूर्ण संबंध हे नेहमीच कौतुकास्पद राहिले.
युसुफ गुलाब शेख यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त ग्रामस्थ, सहकारी कर्मचारी आणि विविध स्तरांतील मान्यवरांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, दीर्घायुष्य आणि यशस्वी वाटचालीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
“सेवा संपली असली तरी समाजासाठीचे योगदान आणि कार्याची आठवण कायम स्मरणात राहील,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

0 Comments