Ticker

6/recent/ticker-posts

वैजापूर तालुक्यात सोलर कंपनी आणि सरकारी अधिकारी यांची मिली भगत शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक मुख्यमंत्र्याच्या आदेशाला केराची टोपली



वैजापूर प्रतिनिधी// रवींद्र पवार 

वैजापूर तालुक्यात मागेल त्याला सोलर योजनेअंतर्गत हजारो शेतकऱ्यांनी आपले सोलर एप्लीकेशन केलेले असून त्यात बऱ्याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतावरती सोलर देखील बसवलेले आहे हे बसविण्यासाठी शेतकऱ्यांना स्वखर्चाने हे सोलर प्लेट शेतात घेऊन जावं लागत आहे तिथेही त्यांना खडी वाळू सिमेंट खड्डे याचाही खर्च स्वतः करावा लागत आहे मराठवाड्यात हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या तरी देखील शेतकऱ्यांची लूट होते आणि हजारो सोलर पंप ना दुरुस्त आहे कंपन्यांना फोन केले असता उडवा उडवी चे  उत्तरे देतात आणि शेतकऱ्यांना सरळ सरळ दम भरतात की तुम्हाला काय करायचे ते करून घ्या मग वैजापूर तालुक्यातील शासकीय अधिकारी मूग गिळून गप्प का आहेत याचा अर्थ असा धरायचा चा की सरकारी अधिकाऱ्यांचा वरदहस्त ? मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत दैनिक लोक युवा त्याचे पाठपुरावे करीत राहणार आणि राज्याचे मुख्यमंत्री ऊर्जामंत्री उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्हा परिषदेचे जिल्हाध्यक्ष तालुक्याचे आमदार नगराध्यक्ष यांना अहवाल सादर करणे

Post a Comment

0 Comments