रुस्तम शेख यवतमाळ प्रतिनिधी :-
कृषि विभाग महाराष्ट्र शासन अंतर्गत तालुका कृषि अधिकारी कार्यालय कळंब व कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा कळंब यांच्या वतीने जे. आर. राठोड, उपविभागीय कृषि अधिकारी यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात प्रशासकीय इमारत कळंब येथील सभागृहात यवतमाळ उपविभाग स्तरीय खरीप हंगाम कार्यशाळा व मार्गदर्शन सभेचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन जे. आर. राठोड उपविभागीय कृषि अधिकारी, प्रमुख मार्गदर्शक म्हणुन डॉ.भगवान कापसे, आंबा पिक मार्गदर्शक,डॉ.एन.डी.पार्लावारसहयोगी अधिष्ठाता( से. नि.) वसंतराव नाईक जैव तंत्रज्ञान महाविद्यालय,यवतमाळ, डॉ.माने सर (से. नि) कापुस बियाणे वाण संशोधक, श्री.किशोर सरोदे अध्यक्ष विदर्भ आंबा उत्पादक संघ ,तालुका कृषि अधिकारी कळंब सुहास बेंडे, तालुका कृषि अधिकारी यवतमाळ पुजा गवई,तालुका कृषि अधिकारी घाटंजी रंजना बोबडे आदी. मंचावर उपस्थित होते.
सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक तालुका कृषि अधिकारी सुहास बेंडे यांनी केले. सर्वप्रथम डॉ. एन. डी. पार्लावार, यांनी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया बाबत तसेच कापूस, सोयाबीन व तुर पिकाचे किड नियंत्रण व खत व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. ख्यातनाम प्रसिद्ध आंबा लागवड व तंत्रज्ञान मार्गदर्शक डॉ. भगवान कापसे यांनी आंबा फळपिक हे शेतकरी बांधवांना पैसे मिळवुन देणारे पिक आहे व आपल्या विदर्भात आंबा पिक चांगले येत असल्याने त्या कडे वळावे असे आवाहन केले. तसेच आंबा पिक लागवड तंत्रज्ञान बाबत मार्गदर्शन केले.किशोर सरोदे यांनी तीन वर्षात आंबा पिकाचे उत्पादन सुरू होते.तसेच दोन वर्षे आंतरपीकही घेता येते याबाबत मार्गदर्शन केले.तर उपविभागिय कृषि अधिकारी यवतमाळ जे. आर. राठोड यांनी क्षेत्रीय अधिकारी, कर्मचारी यांनी अद्ययावत व नवनवीन तंत्रज्ञान ग्राम स्तरावर शेतकरी बांधवांपर्यंत पोहचवावे म्हणुन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याचे मत आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्यक्त केले. शेतकरी बांधवांनी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतीमध्ये उत्पादन व उत्पन्नामध्ये कशी भर घालता येईल याबाबत सखोल मार्गदर्शन केले . डॉ. बी. यु. दुपारे, प्रधान वैज्ञानिक राष्ट्रीय सोयाबीन संशोधन संस्थान इंदोर म.प्र. भारतीय कृषी अनुसंधान परिषद आणि यांची तज्ञ चमू यांनी सोयाबीन पीक व्यवस्थापन बाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन दिनेश उगले आभार प्रदर्शन महेंद्र ओंकार मंडळ कृषी अधिकारी यांनी केले.यशस्वीते करिता मयूर शिरभाते तसेच उपविभागातील सर्व अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

0 Comments