Ticker

6/recent/ticker-posts

दिवा पूर्व स्टेशन परिसरात घाणीचे साम्राज्य



ठाणे स्मार्ट सिटी प्रकल्पातून दिवा शहराला वगळले आहे का..? नागरिकांचा प्रशासनाला सवाल..!

ठाणे/दिवा :- प्रतिनिधी - सयाजी चव्हाण 

दिवा पुर्व स्टेशन परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे मोठमोठे ढिग दिसत आहेत. दिवा पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून चालू आहे. त्या उड्डाण पुलाखाली कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे.  

अलीकडे दिवा शहरात झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या विचारात घेता व परप्रांतीयांचे वाढणारे लोंढे यामुळे प्रशासकीय यंत्रणांवर खरस्तांतर येत नाही ना...

की प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे. याचा विचार केला पाहिजे. दिव्याला मिनी कोकण म्हटलं तर काही वावगे ठरणार नाही. त्यामध्ये कोकणातील लोकसंख्या भरपूर आहे दिवा जंक्शन वरून कोकणात जाणाऱ्या सर्व मेल एक्सप्रेस गाड्या सुटतात. त्यामुळे दिवा स्टेशन पूर्व परिसर नेहमीच गजबजलेले असते .

बाजूलाच मच्छी मार्केट, रिक्षा स्टॅन्ड, नाष्टा सेंटर असल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. स्टेशन परिसरात आल्यानंतर दुर्गंधीमुळे प्रत्येकाचे आपोआपच हात नाकाला लागतात.

त्यामुळे ठाणे महानगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर दिवा पूर्व स्टेशन परिसर स्वच्छ करावा व दररोज कचरा उचलण्यात यावा अशी नागरिकांमधून मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments