Ticker

6/recent/ticker-posts

नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य उपकेंद्रे बनली 'भूत बंगले', कोट्यावधी रुपयांच्या विल्हेवाट



 जिल्हाधिकारी यांना निवेदन देत कारवाईची मागणी; १५ दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा


नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील जुवानी, मालदा, आणि अमोनी या आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था आणि आरोग्य अधिकाऱ्यांच्या कथित दुर्लक्षामुळे झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या नुकसानाबाबत गंभीर आरोप करत जिल्हाधिकारी यांना यासंदर्भात निवेदन देत कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 

या प्रकरणातील नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांची दुरवस्था झाली असून आरोग्य उपकेंद्र भूत बंगले बनली आहे. अनेक ठिकाणी दरवाजे, खिडक्या तुटल्या असून कोट्यवधींचा चुराडा झाला आहे. शासनाने दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून या इमारती उभ्या केल्या. मात्र, नियोजनाचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष यामुळे या इमारती आता वापराविना पडून आहेत.


 *आरोग्य अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष:-* स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडून या उपकेंद्रांची पाहणी किंवा दुरुस्ती होत नसल्याचा आरोप आहे. अनेक उपकेंद्रांवर कर्मचारी उपस्थित राहत नसल्याने ती 'भूत बंगले' बनली आहेत. 


 *नागरिकांचे हाल:-* या उपकेंद्रांवर सुविधा उपलब्ध नसल्याने, छोट्या-छोट्या आजारांसाठी रुग्णांना मैलोन्मैल प्रवास करून तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्हा रुग्णालयात जावे लागते, ज्यामुळे गरिबांना आर्थिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.


 *जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन:-*  या गंभीर परिस्थितीची दखल घेत, दोषी अधिकारी यांच्यावर कारवाई करावी, तसेच उपकेंद्रे तत्काळ दुरुस्त करून सुरू करण्यात यावे.

तसेच तळोदा तालुक्यातील जुवानी, मालदा आणि अमोनी येथील आरोग्य उपकेंद्रांच्या इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊन तीन ते चार वर्षांचा कालावधी लोटला आहे, मात्र केवळ हस्तांतरणाच्या प्रक्रियेत अडकल्याने या वास्तू आज धूळखात पडल्या आहेत. या गंभीर प्रश्नावर 'युवा क्रांती नंदूरबार' सामाजिक संघटनेने आक्रमक पवित्रा घेत थेट जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे जाब विचारला असून, 15 दिवसांत ही केंद्रे सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.

सदर निवेदन समन्वयक विजयसिंग पाडवी आणि जिल्हाध्यक्ष इंजि. संदीप वळवी यांनी सादर केला आहे.

Post a Comment

0 Comments