तब्बल 60 लाख 12 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
(नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी मोईनोद्दीन शाह)
नंदुरबार- दिनांक 02/05/2026 रोजी शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री.हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शहादा पोलीस ठाणे हद्दीतुन अवैध मा वाहतुक होणार आहे, या बाबत खात्रिशीर माहिती मिळालेवरुन शहादा पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी श्री. हेमंतकुमार पाटील यांनी पोलीस ठाण्याचे पथकास सदर बातमीची खात्री करुन कारवाई कामी रवाना केले.
मिळालेल्या गोपनीय माहितीचे आधारे शहादा पोलीस ठाणे पथक हे शहादा ते दोंडाईचा रोडवर नाकाबंदी लावून संशयित बाहनांची तपासणी करीत असतांना एक आयशर वाहन हे नाकाबंदीचे ठिकाणी न थांचता भरधाव वेगाने प्रकाशा रोडकडे निघाल्याने पोलीस पथकास त्यावर संशय बळावल्याने पथकाने सदर वाहनाचा पाठलाग करत त्यास प्रकाशा रोडावर थांबविले असता सदर वाहनाचा क्रमांक RJ 27 GE 9527 असा होता. त्यावरील चालकास व क्लीनरला त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नाव) जिवनराम होशियारसिंग इटकांड, वय-35 वर्ष, 2) अजयकुमार जयवीर दहिया, वय 31 वर्षे, दोन्ही राहणार- हरीयाणा असे सांगितले. त्यांना सदर वाहनात काय आहे. या बाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना पुन्हा विश्वासात घेऊन विचारपुस करता त्यांनी वाहनात विदेशी दारु असल्याची कबूली दिली.
त्याअन्वये एकूण 60,12,000/- रुपये किमतीचे अवैध विदेशी दारुचे एकूण 535 बॉक्स सह वाहन असे जप्त करण्यात आले असुन वर नमुद इसमांविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 477/2026 भा.न्या. संहिता कलम 318, 217 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) 108 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सुरू आहे.
सदरची कारवाई शहादा उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली शहादा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. हेमंतकुमार पाटील, सहा. पोलीस निरीक्षक श्री. प्रविण सोनवणे, पोहेको दिपक चौधरी, पोशि भगवान सावळे, कपिल मंदील अशांनी केली आहे.

0 Comments