*बिरसा फायटर्स़ पिंपळखुटा अध्यक्षपदी रमेश वसावे तर सचिवपदी मंगल वसावे यांची नियुक्ती*
*अक्राणी प्रतिनिधी वसंत पावरा :-*
अक्कलकुवा तालुक्यातील पिंपळखुटा गांवात दिनांक २० मे २०२६ रोजी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी व मार्गदर्शक चंद्रसिंग पवार यांच्या नेतृत्वाखाली बिरसा फायटर्स गाव शाखा -पिंपळखुटा शाखेचे शानदार उद्घाटन करण्यात आले.नवीन कार्यकारिणी निवड करून नियुक्ती पत्र देण्यात आले. गाव अध्यक्षपदी रमेश वसावे यांची निवड करण्यात आली.उपाध्यक्ष गुलाबसिंग वसावे सचिव मंगल वसावे, कार्याध्यक्ष प्रवीण वसावे, कोषाध्यक्ष रूपसिंग वसावे , सहसचिव ईश्वर वसावे,सल्लागार सुनंदा वसावे ,संघटक निलेश वळवी, प्रसिद्धी प्रमुख दिनेश वसावे, महिला प्रतिनिधी जेवंती वसावे, सदस्य रविंद्र वसावे, विजय वसावे,गुमानसिंग वसावे, दिपक वसावे,सायसिंग वसावे अशी नवीन कार्यकारिणी निवड करून जाहीर करण्यात आली. बिरसा फायटर्स ही आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एक आक्रमक सामाजिक संघटना आहे. दिवसेंदिवस संघटनेशी नवं नवीन तरूण कार्यकर्ते सहभागी होत असून संघटनेच्या शाखा वाढतच आहेत.
नवनियुक्त सर्व पदाधिकारी व सदस्यांचे जालिंदर पावरा जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बिरसा फायटर्स़ नंदुरबार यांनी हार्दिक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.कार्यक्रमाला बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, मार्गदर्शक चंद्रसिंग पवार, जिल्हा अध्यक्ष हिरामण खर्डे, तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा, धडगाव तालुका अध्यक्ष सुनिल तडवी, शहाणा शाखेचे जगदीश डुडवे, चूलवड शाखेचे चंद्रकांत पावरा सह गावातील ५० ते ६० बिरसा फायटर्स कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी भगवान बिरसा मुंडा की जय,तंट्या मामा की जय,वीर एकलव्य की जय,क्रांतीवीर खाज्या नाईक की जय,बिरसा फायटर्स जिंदाबाद अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

0 Comments