किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
पर्यावरण संवर्धनासह सामाजिक बांधिलकी जपत ऑटो रिक्षा संघटना किल्ले धारूर यांच्या वतीने धारूर येथील एस.टी. बसस्थानकासमोरील परिसरात वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन व संरक्षण करण्याची जबाबदारी ऑटो रिक्षा चालकांकडे सोपविण्यात आली आहे.
या उपक्रमासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी संघटनेच्या वतीने पाणपोई सुरू करण्यात आली असून, यामुळे प्रवाशांना दिलासा मिळत आहे. वृक्षारोपण व पाणपोई अशा दुहेरी सामाजिक उपक्रमामुळे संघटनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.या कार्यक्रमावेळी ऑटो रिक्षा संघटनेचे पदाधिकारी व सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments