किल्ले धारूर: चेतन लोखंडे (दैनिक लोकयुवा)
धारूर तालुक्यातील मौजे कोळ पिंपरी येथील प्रकाश श्रीरंग साळवे यांची पोलीस पाटील म्हणून निवड झाली आहे, प्रकाश साळवे हे गेल्या वीस वर्षापासून बालहक्क अभियानच्या माध्यमातून मानवी हक्क अभियान सोबत जोडलेले आहेत. मानवी हक्क यांच्या माध्यमातून विविध आंदोलने व वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला आहे त्यांचा आज मानवी हक्क अभियान वतीने धारूर शासकीय विश्रामगृहामध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा युवक अध्यक्ष बाबासाहेब मुजमुले, जिल्हा उपाध्यक्ष महादेव उमाप ,जिल्हा सचिव परमेश्वर आडागळे, तालुका अध्यक्ष किसन लोखंडे, तालुका उपाध्यक्ष हनुमंत अडागळे, तालुका सचिव शिवाजी काळे, शहराध्यक्ष पवन डोईफोडे व ज्येष्ठ मार्गदर्शक वैजनाथ फरताडे हे उपस्थित होते
या सत्कार समारंभाच्या प्रसंगी सत्कारमूर्ती पोलीस पाटील श्री प्रकाश साळवे यांनी सांगितले की मला ही प्रेरणा जिजा कडून मिळाली आहे .मी सतत सामाजिक कामात असल्यामुळे मला हे यश मिळाले आणि मानवी हक्क अभियान च्या कार्यकर्त्यांच्या पाठिंबामुळे मी हे यश संपादन केले .

0 Comments