Ticker

6/recent/ticker-posts

गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ विविध साहित्याने सज्ज



  ( वार्ताहर )

 :साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहुर्त असलेल्या गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठ विविध साहित्याने सज्ज झाली आहे. गाठी, गुढीचे साहित्य, नवी काठी यासह पाडव्यासाठी नवी उत्पादने खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरातील  बाजारपेठ मध्ये येत आहे. १९ मार्च रोजी गुढीपाडवा आल्याने बाजारपेठेमध्ये वस्त्र, साखरेची गाठी मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी आल्या आहेत.

                           हिंदू नववर्षाचा पहिला दिवस, चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा १९ मार्चला साजरा होत आहे. साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त असणाऱ्या गुढीपाडव्याला हिंदू नववर्षाची सुरुवात होते. गुढीपाडव्याचा खास मान असलेल्या साखरेच्या गाठी या वर्षी विविध रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या होत्या. किमान २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे (तांब्या) बसवला जातो. नंतर गुढी पाटावर उभी केली जाते. मात्र आताच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या युगात गुढी उभारण्यासाठी पुरेसा वेळही मिळणे कठीण झाले आहे. याला पर्याय म्हणूनच रेडिमेड गुढीचा नवा ट्रेण्ड निर्माण झाला. टेबलवर, कारमध्ये ठेवता येण्यासारख्या छोट्या गुढीसह मोठ्या रेडिमेड गुढ्या अत्यंत कमी किमतीत ६५ ते २५० रुपयांपर्यंत विविध आकाराच्या गुढय़ा बाजारात उपलब्ध आहेत. पाट आणि त्यावर असलेले नक्षीदार कापड, नारळ, तांब्या, आंब्याची पाने, गुढीभोवती असलेले रेशमी कापड, हार आदी सर्व साहित्याचा समावेश या छोट्या गुढीत पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्या साहित्याची जमवाजमव करण्यापेक्षा या रेडिमेड गुढय़ा घेण्याकडेच आता लोकांचा कल वाढत आहे. सुंदर नक्षीकाम, चमकदार कापड व आकर्षक सजावटीमुळे या मनमोहक रेडिमेड गुढय़ा खरेदी करण्याचा मोह नागरिकांना सहज होतो. साधारण एक फूट उंचीची असलेली ही गुढी घरात कोठेही सहज ठेवता येते.

विविध रंगांमध्ये गाठी बाजारात...

गुढीपाडव्याचा खास मान असलेल्या साखरेच्या गाठी या वर्षी विविध रंगांमध्ये उपलब्ध करण्यात आल्या होत्या. किमान २० रुपयांपासून ते १०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. गुढी म्हणजे आनंद, विजय आणि स्वागताचे प्रतीक. उंच बांबूपासून गुढी तयार केली जाते. बांबूच्या एका टोकाला रेशमी कापड, कडुलिंबाचा, फुलांचा हार आणि साखरेची माळ बांधून त्यावर धातूचे भांडे बसवले जाते नंतर गुढी पाटावर उभी केली जाते.

Post a Comment

0 Comments